
Nagpur Bogus Medicine: नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याद्वारे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचं स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी छापेमारी केली असून सुमारे ७०,००० हून अधिक बोगस औषध जप्त केली आहेत. तसंच याप्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.