
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप्रणित महायुतीला रेकॉर्डब्रेक २३० जागांवर विजय मिळाला. पण हा विजय ईव्हीएम घोटाळ्यामुळं झाला असल्याचा आरोप वारंवार विरोधकांनी केला आहे. यासाठी त्यांनी या निवडणूक ईव्हीएमबाबत झालेले अनेक गैरप्रकार समोर आणले होते.
यापार्श्वभूमीवर आता विरोधकांचं नेतृत्व म्हणून शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ईव्हीएमविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. नुकतीच याचसंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली होती. पण आता याबाबत विशेष काळजी घेण्यात येणार आहे.