
नागपूर : बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीलेश वाघमारेला अटक केल्यावर आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. एसआयटीने रविवारी दोन शाळेतील लिपिकांना अटक केली. चौकशीत लहान भावाने त्याच्यासह मोठ्या भावाचा बोगस आयडी तयार करून शासनाची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचे समोर आले.