Nagpur : आता लग्नासाठी मिळतात भाड्याने ब्रायडल दागिने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jewelry

Nagpur : आता लग्नासाठी मिळतात भाड्याने ब्रायडल दागिने

नागपूर : पार्टी किंवा लग्नसमारंभात वापरले जाणारे महागडे कपडे एकदा अथवा दोनदा वापरले जातात. त्यानंतर हे कपडे कपाट्याच्या एका कोपऱ्यात पडून असतात. त्यामुळे भाड्याचे कपडे देण्याच्या व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. त्यातच आता ब्रायडल ज्वेलरीही भाड्याने देण्याचा व्यवसाय वाढू लागला आहे. डेस्टिनेशन वेडिंगमुळे याचे महत्त्व वाढले आहे.

सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने कृत्रिम दागिने घालण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. विविध प्रकारच्या कृत्रिम दागिन्यांना महिलांची पसंती मिळते. लग्नसराईचे दिवस असल्याने आता ब्रायडल डिझायनर ज्वेलरीला सर्वाधिक मागणी आहे. त्यात ब्राइडल कुंदन, पूल ज्वेलरी, स्टोन ज्वेलरी, कलर ज्वेलरी आणि अँड ज्वेलरीचा समावेश आहे. विशेष म्हणजे ते वापरल्यानंतर अर्ध्या किमतीत ते परत करून दागिन्यांची दुसरी डिझाईनही घेऊ शकत. याशिवाय भाड्यानेही ब्रायडल, संगीताला लागणारी ज्वेलरी मिळते.

सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे अत्याधुनिक डिझाइनच्या कृत्रिम दागिन्यांना चांगली मागणी आहे. कुंदन जडाळ, दागिने, अँटिक ज्वेलरी, तांब्याचे दागिने, राजकोटचे सोन्याचे दागिने, पार्टी वेअर आणि ब्राइडल सेटच्या दागिन्यांना जास्त मागणी आहे. बाजारात अशी काही दुकाने आहेत जिथे कृत्रिम दागिने भाड्याने मिळतात. वाढत्या महागाईमुळे प्रत्येकाला सोने-हिरे खरेदी करणे शक्य होत नसल्याने स्टायलिश आणि परवडणाऱ्या कृत्रिम दागिन्यांची मागणी बाजारात वाढत आहे.

आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये महिलांना वेगवेगळ्या डिझाईन्सच्या बांगड्या आवडतात. यात डायमंडच्या बांगड्यांना सर्वाधिक पसंती दिली जाते. तसेच सोन्यापासून बनवलेल्या पोल्की बांगड्यांना मागणी आहे. याशिवाय महिलांना काचेच्या पितळी बांगड्या आवडतात. बांगड्यांसोबत मॅचिंग अनेक प्रकारच्या इअर रिंग्स घेतल्या जात आहेत. पाश्चात्त्य शैलीतील नेकलेसला मोठी मागणी आहे.

-नीलेश शर्मा, ज्वेलरी व्यावसायिक

डेस्टिनेशन ज्वेलरीमुळे पाहुण्यांची संख्या कमी झाल्याने तीन ते चार दिवस थिमबेस लग्नसोहळे होत आहेत. संगीत, मेहंदी, लग्न, स्वागत सोहळ्यासाठी विविध प्रकारच्या ज्वेलरीला मागणी असते. त्यानुसार कृत्रिम ज्वेलरीची मागणी वाढली आहे. गेल्या तीन ते चार वर्षात यात अधिकच वाढ झाली.

-सुहासिनी चंद्रशेखर शाहू, संचालक, लाहनीज नाट्यश्रृंगार

टॅग्स :Nagpurgoldwomen