Nagpur Bull Attack Incident
esakal
नागपूर : मानवी वस्त्यांमध्ये मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा धोका किती गंभीर ठरू शकतो, याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे. २७ जानेवारी रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास, घरासमोर झाडू करत असताना ६४ वर्षीय वंदना देवीकर यांच्यावर एका मोकाट वळूने अचानक हल्ला केला. त्या वेळी गल्लीत फारशी वर्दळ नव्हती. अचानक झालेल्या या हल्ल्यात त्या गंभीर जखमी (Elderly Woman Critically Injured in Nagpur Bull Attack) झाल्या.