

An Aapli Bus crashes into a Metro pillar after hitting a pedestrian at Ajni Square in Nagpur, leaving the bus conductor seriously injured.
esakal
नागपूर: अजनी चौकात रविवारी सकाळी भरधाव ‘आपली बस’ने रस्ता ओलांडणाऱ्याला चिरडले. राजीव महेंद्रलाल शाह (वय ५६, रा. धनराज हाईट्स, धंतोली) असे मृतकाचे नाव आहे. धडकेनंतर बस मेट्रोच्या खांबावर आदळून महिला वाहक गंभीर जखमी झाली.
रविवारी सकाळी अजनी चौकातून आपली बस वेगाने जात होती. या दरम्यान रस्ता ओलांडणाऱ्या राजीव शाह यांना बसने जोरदार धडक दिली.