नागपूर : निम्म्या बस नादुरुस्त! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st bus strike

नागपूर : निम्म्या बस नादुरुस्त!

नागपूर : संपामुळे पाच महिन्यापासून एसटीच्या कार्यशाळेतील यांत्रिक कर्मचारीच कामावर नसल्याने गाड्यांची देखभाल दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे नागपूर विभागातील ४१८ बसगाड्यांपैकी १८९ बसेस नादुरूस्त आहेत. अनेक महिन्यांपासून जागेवरच उभ्या असल्याने त्यांच्या दुरुस्तीवर महामंडळाला मोठा खर्च करावा लागणार आहे.

नागपूर विभागात एसटीच्या ४१८ बसगाड्या आहेत. त्यापैकी केवळ २२९ सध्या रस्त्यावर धावत आहेत. कामगार संघटनेने विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला. त्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये चालक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांचा अधिक सहभाग होता. चालकाशिवाय बस रस्त्यावर धावू शकत नाही. तर बिघाड झालेल्या बसची यांत्रिक कर्मचाऱ्यांअभावी दुरुस्ती होऊ शकत नाही. त्यामुळे नागपूर विभागात पाच महिन्यापूर्वी सर्व बसेसची चाके थांबली होती. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कंत्राटी चालकांच्या मदतीने बस धावण्यास सुरुवात झाली. १ जानेवारीला १८ बस धावायला लागल्या.

नंतर काही एसटीचे चालक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने बसफेऱ्यांची संख्या वाढू लागली. सध्या संपातील बरेच कर्मचारी रुजू झाल्याने शनिवारी १७ एप्रिलपर्यंत या बसेसची संख्या २२९ होती.

नागपूर विभागात ४१८ बसगाड्या आहेत. उर्वरित बस बंद अवस्थेत आहेत. ही संख्या जवळपास दोनशेच्या घरात आहे. गाड्यांची देखभाल होत नसल्याने सर्व गाड्या नादुरुस्त असल्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे या गाड्यांच्या दुरुस्तीस वेळ लागणार आहे. यांत्रिक कर्मचारी संपात असल्याने गाड्यांची देखभाल होत नव्हती. मात्र, आता संपातील बऱ्यापैकी यांत्रिक कर्मचारी सेवेत रुजू झाल्याने नादुरुस्त असलेल्या गाड्यांना दुरुस्तीस वेग येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Nagpur Bus Strike Many Vehicles Wrecked Not Repaired

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top