Nagpur Cement Road Damage : सिमेंट रस्ता फोडला; खड्डा तसाच सोडला! ; पंधरा दिवसांपूर्वी केलेल्या खोदकामानंतर सपाटीकरणाकडे दुर्लक्ष

Cement Road Damaged Near Kadambini Vihar : नागपूरच्या बेसा-घोगली मार्गावर कादंबिनी विहारजवळ विकासकामासाठी सिमेंट रस्ता फोडल्यानंतर खड्डा तसाच राहिल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे.
Nagpur Cement Road Damage

Nagpur Cement Road Damage

esakal

Updated on

नागपूर : कोट्यवधींच्या खर्चातून बांधलेला सिमेंटचा रस्ता विकासकामाच्या नावाखाली फोडला. पण, पूर्ववत करण्यात आला नाही. त्यामुळे परिणामी बेसा-घोगली मार्गावरील कादंबिनी विहारजवळ खड्डा निर्माण झाला असून तो अपघाताचा सापळा ठरला आहे. येथून प्रवास करताना पाठीच्या कण्यालाच इजा होण्याची भीती आहे.

कादंबिनी विहारजवळून जाणाऱ्या बेसा-घोगली मार्गावर वाहनांचा सतत राबता असतो. सिमेंट रस्त्याच्या मधोमध केलेल्या खोदकामाच्या ठिकाणी आता उंच-सखल पृष्ठभाग तयार झाला आहे.

चारचाकी वाहनांचा वेग कमी होतो, तर येथे तयार झालेला खड्डा दुचाकीस्वारांसाठी अधिक धोकादायक ठरत आहे. खड्ड्यातून दुचाकी गेल्यावर अचानक बसणाऱ्या धक्क्यामुळे वाहनाचा तोल जाण्याची शक्यता निर्माण होते.

स्थानिकांच्या सांगण्यानुसार, या ठिकाणी काही दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. संबंधित विभागाने येथे तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी स्थानिकांची मागणी आहे.

Nagpur Cement Road Damage
Nagpur SIR Voter Hearing : नोटीसपात्र सर्व मतदारांना सुनावणी अनिवार्यच; बीएलओ स्तरावर किरकोळ दुरुस्तीची मुभा; मात्र ॲपमध्ये नोटीसशिवाय बदलच शक्य नाही!

दरवेळी बसतो जोराचा धक्का

‘सकाळ’चे प्रतिनिधी या धोकादायक ठिकाणी हजर असतानाच मोपेडस्वार दोघे पडता-पडता वाचले. खड्ड्यातून वाहनाने उसळी घेताच मागे बसलेल्या व्यक्तीचा तोल गेला. चालकाने कसेबसे वाहनावर नियंत्रण मिळवले. पण, काही क्षणांसाठी दोघांचेही लक्ष रस्त्याऐवजी स्वतःला सावरण्याकडे गेले. हा प्रकार अपघाताला निमंत्रण देणारा ठरला. त्यांची विचारपूस केली असता यामार्गाने ये-जा करताना खड्ड्यामुळे दरवेळी जोराचा धक्का बसतो. अपघात टळला असला, तरी दरवेळी शरीराला बसणारा धक्का टाळता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

जबाबदारी नेमकी कोणाची?

पूर्वी डांबरी रस्ता असताना पाइपलाइन, केबल किंवा इतर कामांसाठी रस्ता खोदणे तुलनेने सोपे होते. मात्र, आता असलेला सिमेंट रस्त्याचे फोडकाम करताना रस्त्याची गुणवत्ता आणि नागरिकांचा पैसा दोन्ही धोक्यात येत आहेत. रस्ता खोदायचाच असेल तर तो पूर्ववत करण्याची जबाबदारी कोणाची, यासाठी दाद मागायची असेल तर जायचे कुणाकडे, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com