QR Code for Railway Fine: आता क्युआर कोडने रेल्वे प्रवाशांकडून दंड वसूल, टीसींना हँड हेल्ड टर्मिनल मशिनमध्ये सुविधा

विनातिकीट रेल्वेत प्रवास करताना पकडल्यानंतर खिशात पैसे नसल्याचे कारण प्रवासी देतात. डिजिटल व्यवहारात झालेली वृद्धी लक्षात घेऊन रेल्वेने टीसींना हँड हेल्ड टर्मिनल मशिनमध्ये क्युआर कोड स्कॅनची सुविधा दिली आहे.
Nagpur
Nagpur Esakal

QR Code Fining System: विनातिकीट रेल्वेत प्रवास करताना पकडल्यानंतर खिशात पैसे नसल्याचे कारण प्रवासी देतात. डिजिटल व्यवहारात झालेली वृद्धी लक्षात घेऊन रेल्वेने टीसींना हँड हेल्ड टर्मिनल मशिनमध्ये क्युआर कोड स्कॅनची सुविधा दिली आहे. याची सुरुवात नवीन आर्थिक वर्ष म्हणजे एक एप्रिलपासून करण्यात आली आहे. त्यामुळे विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून आता ऑनलाइन दंड सुद्धा वसुल केला जाणार आहे.

रेल्वेत विनातिकीट प्रवासासाठी आर्थिक दंड आणि तुरुंगवासाची तरतूद आहे. सध्या देशात डिजिटल व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे अनेकांकडे रोख रक्कम नसते. रेल्वेतर्फे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून फुकट्या प्रवाशांकडून दंड आकारणे सुरू केले आहे.

लांब पल्ल्याच्या रेल्वेत अनेक जण जनरल तिकिटांवर वातानुकूलित किंवा शयनयान डब्यातून प्रवास करतात. अशा प्रवाशांना टीसीने पकडल्यानंतर ते खिशात पैसे नसल्याचे सांगतात. पण आता अशा प्रवाशांकडूनही डिजिटल पद्धतीने दंड वसूल करण्यात येणार आहे. यासाठी स्थानकावरील आणि धावत्या रेल्वेगाडीमध्ये टीसींना हँड हेल्ड टर्मिनल मशिनमध्ये क्युआर कोड स्कॅनिंगची सुविधा देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

तपासणीत प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळला तर दंड भरण्यासाठी प्रवाशाला हँड हेल्ड टर्मिनल मशिनमध्ये आपली पूर्ण माहिती भरावी लागेल. त्यानंतर क्युआर कोड जनरेट होईल. प्रवाशाला मोबाईलद्वारे तो क्युआर कोड स्कॅन करून दंडाचे पैसे भरता येतील. यामुळे व्यवहारात पारदर्शकता येईल आणि प्रवाशांकडून पैसे घेत असल्याच्या आरोपातून टीसींचाही बचाव होईल.

Nagpur
Navi Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! नवभारत इंडस्ट्रियल कंपनीला आग, अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com