फटाक्यातील केमिकल, आवाजाचा गर्भवतींना धोका

Pregnant Women
Pregnant Women Sakal

नागपूर : दिवाळीत दिव्यांची रोषणाई, रांगोळ्यांची आरास, फराळाची रेलचेल, खरेदीची मौजमजा असते. त्यात फटाक्‍यांच्या आतषबाजीचा आनंदही असतो. फटाके उडवताना क्षणाची चूक झाली तर जिवावर बेतू शकते. मात्र फटक्यांनी भाजल्याने त्वचेवर, धुराने डोळ्यावर तर फटाक्‍यांच्या आवाजांमुळे गर्भवती मातांचा रक्तदाब वाढतो. गर्भातील जिवावरही विपरीत परिणाम होण्याची भीती आहे, अचानक वाढलेल्या आवाजामुळे गर्भपाताची शक्यता असते, असा सूर वैद्यक तज्ज्ञांशी यांच्याशी साधलेल्या संवादातून पुढे आला.

दिवाळी सण प्रकाशाची उधळण करणारा आहे. प्रकाशाचे गाणे गाणारा हा सण लहानमोठ्या सगळ्याचेच आयुष्य उजळून टाकतो. या सणाला प्रत्येक जण आपापल्या परीने आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतो. मात्र जरा सावधगिरीने साजरा करण्याची गरज आहे. फटाक्‍यांमध्ये कॉपर, मॅग्नेशिअम, सोडियम, झिंक, कॅडमियम, शिसे, नायट्रेट, नायट्राईट आदि घातक रसायने असतात. फटाक्‍यांच्या आवाजाबरोबरच फटाके वाजवल्यामुळे निघणाऱ्या धूरातील रसायनांमुळे सामान्यांप्रमाणेच गर्भवती मातेसह कोवळ्या बाळाच्या जिवाला धोका आहे. फटाके फोडलेल्या ठिकाणाचे तापमान वाढते. त्यात गर्भातील बाळाला २० आठवड्यानंतर ऐकण्याची जाणीव येते. अशा गर्भवती मातांना अचानक वेदना सुरू होतात. गर्भपाताचीही भीती असते. आवाजामुळे गर्भातील जिवाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. घातक रसायनांच्या धूर गर्भवतीच्या श्वसनाद्रारे शरीरात गेला तर त्याचे विपरीत परिमाण बाळावर होण्याची भीती आहे. यामुळे गर्भवती मातांनी फटाक्यांपासून जरा दूरच राहावे, असा सल्ला स्त्री व प्रसूतीरोगतज्ज्ञ डॉ.सीमा दंदे यांनी दिला.

Pregnant Women
पेगासस हा भारतीय लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न होता - राहुल गांधी

डॉ. दंदे फाउंडेशनचे संचालक डॉ. पिनाक दंदे म्हणाले, दिवाळीच्या मोसमात प्रदूषण वेगाने वाढते. प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम आपण सारेजण उघड्या डोळ्यांनी पाहतो, परंतु यावर आवर घालण्यासाठी कोणतीही उपाययोजना करीत नाही. फटाक्यातील रसायने दमा, न्यूमोनिया आणि फुफ्फुसाचे आजार होण्यास कारणीभूत ठरतात. परिमाणी याचा भावी पिढीवर परिमाण होण्याची दाट शक्यता असते. फटाक्यांमुळे दरवर्षी सुमारे हजारावर लोकांची दृष्टी जाते. फटाक्याने भाजल्यानंतर त्वचेवरही परिमाण होतो.

संकल्प प्रदूषणमुक्त दिवाळीचा

उत्साह, चैतन्य, मांगल्याचा सण दिवाळी प्रत्येक जण आपापल्या परीने साजरा करतो. परंतु तो साजरा करीत असताना प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक दीपोत्सव साजरा करण्यावर भर देणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. कोरोनाचे मळभ हळूहळू दूर होत असताना त्यापासून बोध घेणे गरजेचे आहे. प्रदूषणमुक्तीकडे वाटचाल करण्याच्या दिशेने आजपासून ‘सकाळ’मध्ये नवी मालिका सुरु करत आहोत.

"फटाक्यात असलेल्या घटकांचा निर्जीव आणि जीवित दोघांवरही दुष्परिणाम होतो. फटाका फुटल्यानंतर निघणारा धूर जसा सजिवांच्या डोळ्यांना व फुफ्फुसांना तसेच त्वचेला अपायकारक असतो. त्यामुळे दमा व अ‍ॅलर्जीचे प्रमाण वाढते. तसेच ध्वनिप्रदूषणासह जलप्रदूषण आणि वायुप्रदूषणामुळे निर्जीव असलेल्या वृक्षवल्लींवरही परिमाण होतो. यामुळे फटाके वाजवा परंतु सांभाळून. आरोग्यदायी दिवाळी साजरी करण्यासाठी सतर्क राहावे."

- डॉ. पिनाक दंदे, संचालक डॉ. दंदे फाउंडेशन, नागपूर.

"दिवाळीत आठवडाभर फटाके वाजवले जातात. यामुळे प्रदूषण नक्कीच होते. गर्भवतींना यामुळे श्‍वास घेण्यापासून तर गर्भातील बाळाला धोका असतो. फटाक्यांचा आवाज डेसीमलमध्ये मोजले जातात. ८५ डेसीमलपर्यंत आवाज सातत्याने गर्भवतीच्या कानावर पडले तर गर्भातील जीव असलेल्या बाळाच्या कानावर परिणाम होतो. विशेष असे की, मोठ्या फटाक्यांचा आवाज हा १४० ते १५० डेसिबल असतो. यामुळे त्याचा परिणाम गर्भातील बाळावर नक्कीच होतो."

-डॉ. सीमा दंदे, स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञ, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com