

AQI Crosses 223 in Nagpur, PM2.5 Turns Dangerous for Public Health
Sakal
नागपूर : उपराजधानीत सध्या निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच वायू प्रदूषणानेही डोके वर काढले आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी अंबाझरी परिसरातील हवा शहरात सर्वाधिक प्रदूषित ठरली. शाळांना सुटी असल्याने स्कूलबस, व्हॅन, विद्यार्थ्यांना ने-आण करणारे ऑटो रस्त्यावर नव्हते, तरीही हवेच्या गुणवत्तेत कोणतीही सुधारणा दिसून आली नाही, हे उल्लेखनीय.