11th Class Admissions: दुसऱ्या फेरीत आतापर्यंत आठ हजारांवर प्रवेश; अकरावीसाठी आजपासून प्राधान्यक्रम निवडण्याची संधी
Nagpur News: नागपूर जिल्ह्यात अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत ८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. आता तिसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
नागपूर : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयात प्रवेश सुरू आहेत. आतापर्यंत आठ हजारांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश नोंदविण्यात आले आहे. दरम्यान तिसऱ्या फेरीसाठी आजपासून महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम निवडण्याची संधी देण्यात आलेली आहे.