
नागपूर : जरीपटका येथील उत्थान नागरी सहकारी पतसंस्थेच्या भागधारकांकडून ठेवी घेत, गैरवापर करून ग्राहकांची साडेचार कोटी रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी लेखापरीक्षक नारायण धनपतराव गाधेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून संस्थेचे अध्यक्ष, संचालक आणि पिग्मी एजंट अशा २१ जणांविरोधात जरीपटका पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.