Nagpur Crime: संस्थाचालकाला मागितली ५ कोटींची खंडणी; कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल
Nagpur News: नागपूर येथील एका महाविद्यालयातील उपप्राचार्याने प्राचार्य आणि व्यवस्थापनावर खोट्या तक्रारी करून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. कोतवाली पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नागपूर : सातत्याने आरोप, खोट्या तक्रारी करून शिक्षण संस्थाचालकाची प्रतिमा मलीन करीत, पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्याविरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.