Nagpur Crime
esakal
नागपूर : मुलीच्या प्रकरणातून महाविद्यालयीन विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. ही घटना पारडी येथील एचबी टाऊन परिसरातील उमंग सावजी जवळ रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी (Police) तत्काळ कारवाई करून एका आरोपीला अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.