Nagpur : काँग्रेसचा भाजपला जोरदार धक्का

भाजपचा सुपडा साफ : पंचायत समिती निवडणूक
 BJP Congress
BJP Congress esakal

नागपूर : पुरेस संख्याबळ नसताना जिल्हा परिषद ताब्यात घ्यायला निघालेल्या भाजपला पंचायत समिती सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीत शनिवारी पराभवाचा जोरदार धक्का बसला. महाविकास आघाडीने १३ पैकी १२ जागा जिंकल्या असून ग्रामीण भागात आपलेच वर्चस्व असल्याचे काँग्रेसने दाखवून दिले.

 BJP Congress
Nagpur : राज्याचे नवे खनिकर्म धोरण : फडणवीस

अनेक वर्षांपासून नागपूरच्या ग्रामीण भागाचे नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे करीत आहे. पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात चांगलाच दबदबा निर्माण केला होता. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री आहेत. दोन बडे नेते जिल्ह्यात असताना झालेला पराभव भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे.

 BJP Congress
Nagpur : सभापतिपदावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व

जिल्ह्यातील १३ पंचायत समितीपैकी काँग्रेस ९, राष्ट्रवादी काँग्रेस २ आणि शिवसेना १ जागेवर विजयी झाली. भाजपला फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले. उमरेड, कुही, भिवापूर, कामठी, मौदा, रामटेक,पारशिवनी, सावनेर, कळमेश्वर, हिंगणा, नागपूर (ग्रामीण), काटोल, नरखेड या तेराही तालुक्यात पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुका पार पडल्या.

 BJP Congress
Nagpur: फडणवीसांच्या नागपूरमध्येच भाजपला धक्का; 13 पैकी 9 पंचायत समित्या काँग्रेसकडे

माजी मंत्री आमदार सुनील केदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढवण्यात आल्या होत्या. आमदार राजू पारवे, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, सुरेश भोयर, जिल्हा परिषद अध्यक्ष, रश्मी बर्वे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कुंदा राऊत, सचिव संजय मेश्राम आदी सर्वांचे काँग्रेसच्या विजयात योगदान लाभले. जिल्ह्यात मोठ मोठे नेते असताना भाजपचा पराभव झाल्याने काँग्रेसतर्फे गावोगावी जल्लोश साजरा केला जात आहे.

 BJP Congress
Nagpur : मनोहर म्हैसाळकर अनंतात विलीन

यापूर्वी जिल्हा परिषद जिंकून काँग्रेसने भाजपला इशारा दिला होता. विधानसभेच्या निवडणुकीतही उमेरड आणि काटोल विधानसभा मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपच्या तावडीतून हिसकावून आणले होते. कामठी मतदारसंघात भाजपचे आमदार टेकचंद सावरकर थोडक्यात बचावले. सावनेरमध्ये केदार यांनी निर्विवाद आपले वर्चस्व कायम ठेवले तर रामटेकमध्ये बंडखोर शिवसैनिक आशिष जयस्वाल यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. त्यापूर्वी सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार होते. राज्यात सत्ता आल्यानंतर नागपूर जिल्हा आणि शहरात पक्षाचा ग्राफ घसरत चालल्याने भाजपवर चिंतन करण्याची वेळ आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com