Nagpur: काँग्रेसच्या वैदर्भीय नेत्यांना ‘अच्छे दिन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress

काँग्रेसच्या वैदर्भीय नेत्यांना ‘अच्छे दिन’

नागपूर : नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांना चांगले दिवस आले आहेत. विदर्भातील सुमारे डझनभर नेत्यांची वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्यांमध्ये प्रामुख्याने नागपूर विभागीय पदवीधर संघाचे आमदार अभिजित वंजारी, नाना गावंडे, रामकिशन ओझा, उमाकांत अग्निहोत्री, किशोर गजभिये, वामन कासावार, अमर काळे, अविनाश वारजूरकर, शकूर नगानी, वीरेंद्र जगताप यांचा समावेश आहे.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

अभिजित वंजारी यांच्याकडे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाना गावंडे बुलडाणा, रामकिशन ओझा जालना, अविनाश वारजूरकर अकोला, किशोर गजभिये चंद्रपूर, नामदेवराव किरपान गडचिरोली, शकूर नगानी अमरावती, अमर काळे अमरावती ग्रामीण तसेच उमाकांत अग्निहोत्री यांच्याकडे उल्हासनगर शहराचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या सोबतीला सहप्रभारीही नियुक्त करण्यात आले आहेत.

जगताप नागपुरात, ग्रामीणमध्ये कासावार

नागपूर शहराचे प्रभारी म्हणून माजी आमदार वीरेंद्र जगताप यांची तर ग्रामीणचे प्रभारी म्हणून वामनराव कासावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जगताप यांनी समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध केला होता. त्यांच्या मतदारसंघातील जागा देण्यासही त्यांनी नकार दिला होता. वामनराव कासावार यवतमाळ जिल्ह्याचे आहेत. ते वणी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

loading image
go to top