नागपूर महिन्याभरात ६५ हजार कोरोना बाधित

रविवारी १२ मृत्यू तर ३०५७ नवे रुग्ण
Nagpur Corona News Latest Update
Nagpur Corona News Latest Updatesakal

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून गेल्या तीस दिवसांमध्ये ६५ हजार ३०० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ३१ हजार ९१० होती. या तीस दिवसांमध्ये तिसऱ्या लाटेत ११२ जणांचा कोरोनाने बळी घेतला. रविवारी (ता.३०) १२ नागरिकांचा मृत्यू झाला असून ३ हजार ५७ पॉझिटिव्ह आढळले. (Nagpur Corona News Latest Update)

Nagpur Corona News Latest Update
दहावी-बारावीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र! एका वर्गात 25 विद्यार्थी

रविवारी शहरातील १० तर जिल्ह्याबाहेरील २ अशा एकूण १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या १० हजार २३४ वर पोहचली आहे. दिवसभरात जिल्ह्यात ११ हजार ३३८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ३ हजार ५७ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळले. यात शहरातील १ हजार ७७०, ग्रामीणमधून १ हजार १८३ व जिल्ह्याबाहेरील १०४ जणांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ५९ हजार ४०३ वर पोहचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रविवारी ४ हजार ५८९ जणांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्यात २४, ६०० सक्रिय कोरोनाबाधित

जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आकडा जरी फुगला असला तरी गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. आज घडिला शहरात १७ हजार ३५२, ग्रामीणमध्ये ६ हजार ९७७ व जिल्ह्याबाहेरील २७१ असे २४ हजार ६०० सक्रिय कोरोनाबाधित असले तरी यापैकी केवळ ३ हजार ७८६ कोरोनाबाधितांना (१५.३९ टक्के) सौम्य, मध्यम व तीव्र अशी लक्षणे आहेत. त्यांना मेयो, मेडिकलसह इतर शासकीय व खासगी कोविड रुग्णालयात तसेच संस्थात्मक विलगीकरणात उपचार सुरू हेत. जिल्ह्यात २० हजार ८१४ जण गृह विलगीकरणात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com