Nagpur News : नागपुरातील कापूस व्यापाऱ्याने बनावट देयकांच्या आधारे कापूस विक्री करत दलालाची व कंपनीची तब्बल दीड कोटी रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी तहसील पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर : दलालाच्या माध्यमातून कापसाच्या गाठींची खरेदी करून बनावट देयकांच्या आधारे त्याची परस्पर विक्री करून नागपुरातील कापूस व्यापाऱ्याने दलाल आणि कंपनीची दीड कोटी रुपयांनी फसवणूक केली.