परिषद निवडणूक; उमेदवाराच्या निवडीसाठी कॉंग्रेसची चाचपणी | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर परिषद निवडणूक

नागपूर परिषद निवडणूक : उमेदवाराच्या निवडीसाठी कॉंग्रेसची चाचपणी

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : विधान परिषदेच्या उमेदवारासाठी काँग्रेसनेही चाचपणी सुरू केली असून बुधवारी पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या रवीभवन येथील कॉटेज क्रमांक नऊ येथे बैठक घेण्यात आली. यात जिल्हा परिषद आणि नगर परिषदेचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठककीला सुनील केदार यांच्यासह जिल्हाध्यक्ष व उमेदवारांच्या शर्यतील सर्वाधिक आघाडीवर असलेले राजेंद्र मुळक हेसुद्धा उपस्थित होते. ग्रामीणची बैठक असल्याने शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे नुसते भेट देऊन गेल्याचे समजते. जिल्हा परिषदेतील ३६, महापालिकेतील २९ आणि शिवसेना दोन व राष्ट्रवादीचा एक नगरसेवक असे ६८ सदस्य काँग्रेसच्या महाविकास आघाडीकडे आहेत.

हेही वाचा: आज हत्तीरोग दिन : शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत नऊ हजार रुग्ण

मात्र नगर पालिकेच्या सदस्यांची संख्या मोठी आहे. साडेतीनशेच्या घरात नगर पालिकेचे सदस्य मतदार असल्याने त्यातील अधिकाधिक आपल्याकडे वळवण्याची कसरत काँग्रेसला करावी लागणार आहे. ग्रामीणमध्ये सुनील केदार यांचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषदे त्यांनी एकहाती काँग्रेसला मिळवून दिली. सर्व तालुक्यांमध्ये त्यांचा प्रभाव आहे. ग्रामीणचे राजकारण सत्तेभोवती फिरते असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे काँग्रेसलाही विधान परिषद खुनावत आहे.

आज घडीला राजेंद्र मुळक यांच्याशिवाय दुसरा पर्यात काँग्रेसकडे नाही. मुळक यांनी यापूर्वीसुद्धा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. भाजपचे संख्याबळ अधिक असतानाही ते चार मतांनी विजयी झाले होते. भाजपचे उमेदवार माजी आमदार अशोक मानकर यांचा त्यांनी पराभव केला होता. मात्र तेव्हा काँग्रेस आणि भाजपमध्ये आज एवढी खुन्नस नव्हती. याच निवडणुकीत ‘स्पाय पेन'चा विषय चांगलाच गाजला होता.

हेही वाचा: मोठी उद्दिष्टे निश्‍चित करा

याविरोधात पराभूत उमेदवार अशोक मानकर यांनी उच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली होती. मात्र ती टिकाव धरू शकली नाही. मतदान करताना कोणाला दिले हे बघण्यासाठी मुळक यांनी स्पाय पेन मतदारांना पुरवले होते असा मानकर यांचा आरोप होता. यानंतर मात्र मतदान केंद्रात मोबाईल व स्पायपेन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत मताधिक्य कोणाकडे जास्त यापेक्षा अधिक महत्त्व ‘प्लानिंग'ला असते. यापूर्वी आम्ही निवडणूक जिंकली तेव्हासुद्धा आमच्याकडे सुमारे ४५ मते कमी होती. त्यामुळे काँग्रेससाठी संख्याबळाचा मुद्दा गौण आहे. महाविकास आघाडी एकत्र लढली तर चमत्कार घडू शकतो.

- राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

loading image
go to top