नागपूर : महाल भागात १७ मार्च रोजी झालेल्या राड्यात परिसरातील शंभरावर नागरिकांविरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील नऊ आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता..‘जामीन हा नियम आहे आणि तुरुंगवास हा अपवाद आहे’ हे कायद्याचे तत्त्व आहे. तसेच प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र आधीच दाखल केले गेले आहे. प्रकरणाचा निकाल लागेलच त्यामुळे आरोपींना तुरुंगात ठेवून कोणताही उद्देश साध्य होणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने या नऊ जणांचा सशर्त जामीन मंजूर केला..या प्रकरणावर न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके यांच्या समक्ष सुनावणी झाली. मो. राहील झाकिर खान, मो. यासिर साकिब खान (वय २१, दोघेही रा. गंजीपेठ रोड, भालदरपुरा), इझाज अंसारी, अफसार अंसारी, मो. मुज्जमिल अंसारी (वय ३१, रा. मोमिनपूरा), अशफाक खान अमिमुल्ला खान, मो. इक्बाल इस्माईल अंसारी अशा नऊ आरोपींनी या प्रकरणात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. कनिष्ठ न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती..अर्जानुसार महालमध्ये झालेल्या राड्याचा सूत्रधार म्हणून फहीम शमीम खान (वय ३८, रा. संजयबाग कॉलनी,नागपूर ) याच्यासह शेकडो आरोपींवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु, पोलिसांनी कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय आम्हाला अटक केली. केवळ गुप्त माहितीचा आधार घेतल्याचे पोलिसांनी नमूद केले. मुख्य म्हणजे घटनेतील मुख्य सूत्रधार फहीम खानच्या सनी युथ फोर्सच्या व्हॉट्सॲप समुहाचे देखील आम्ही सदस्य नसून ओळख परेडमध्ये देखील आमची ओळख पटली नाही. त्यामुळे जामीन मंजूर करण्याची विनंती या आरोपींनी केली होती. न्यायालयाने सर्व बाजू लक्षात घेत प्रकरणावरील निकाल राखून ठेवला होता..Amravati Crime : दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार आई-वडिलांना झोपेच्या गोळ्या देऊन अपहरण.आरोपींतर्फे वरिष्ठ विधिज्ञ ॲड. ए. व्ही. गुप्ता, ॲड. श्रीरंग भांडारकर, ॲड. सय्यद आतीब, ॲड. रफीक अकबानी, ॲड. मो. नावीद ओपई, ॲड. अथर्व खडसे यांनी बाजू मांडली, तर शासनातर्फे मुख्य सरकारी वकील आणि वरिष्ठ विधिज्ञ ॲड. देवेन चौहान आणि ॲड. नितीन जावडे यांनी बाजू मांडली..जामिनासाठी अटीजामीन अर्जावरील निकाल शुक्रवारी न्यायालयाने राखून ठेवला होता. आज निकाल देताना प्रत्येक आरोपीचा एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. तसेच आरोपी प्रत्येक महिन्याच्या १ आणि १५ तारखेला पोलिस स्थानकात हजेरी लावतील, अशा प्रकारच्या समान कृत्यांमध्ये सहभागी होणार नाहीत आणि असा कोणताही गुन्हा नोंद झाल्यास त्यांचा जामीन रद्द केला जाईल, साक्षीदारांना धमकावणार नाही आणि खटल्याच्या प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहतील इत्यादी अटी घालण्यात आल्या आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.