Nagpur: ८८ टक्के कुटुंबांनी दाखविला पोलिसांवर ‘भरोसा’, दोन हजारावर प्रकरणांचा निपटारा

कौटुंबिक हिंसाचार असो वा इतर क्षुल्लक वादातून तणाव निर्माण होऊन कुटुंबाची वाताहत होते. त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती एकमेकांच्या विरोधात पोलिस ठाण्याची पायरी चढतात.
Jalna police news
Jalna police newsesakal
Updated on

Nagpur Crime Cases: कौटुंबिक हिंसाचार असो वा इतर क्षुल्लक वादातून तणाव निर्माण होऊन कुटुंबाची वाताहत होते. त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती एकमेकांच्या विरोधात पोलिस ठाण्याची पायरी चढतात. मग ते पती-पत्नी असो वा भाऊबंदकी. समुपदेशनाच्या माध्यमातून हा वाद मिटविणे शक्य असल्याने शहरातील ‘भरोसा सेल’वर ८८ टक्के कुटुंबांनी विश्‍वास दाखवीत, आपल्या प्रकरणांचा निपटारा केला आहे.

पती-पत्नीतील वाद आणि सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा होणारा छळ वा इतर कौटुंबिक वाद यासाठी आलेल्या तक्रारी समुपदेशनासाठी ‘भरोसा सेल’कडे पाठविण्यात येतात. जवळ वर्षभरात दोन ते अडीच हजार प्रकरणे या विभागाकडे येतात. त्यामुळे विधि सेवेसह, मानसोपचार समुपदेशन, महिला सहायता, वन स्टॉप सेंटर असो वा निवाऱ्याची व्यवस्था आदी सोयी सेलच्या माध्यमातून पुरविण्यात येतात. मुख्यतः समुपदेशनातून अनेकदा प्रकरणे हाताळताना दोन्ही कुटुंबातील नात्याची वीण कायम राहण्यावर भर देत, त्यांच्या कुटुंबाला जोडण्याचे काम सेलच्या माध्यमातून केले जाते.(Latest Marathi news)

गेल्या वर्षभऱ्यात २ हजार प्रकरणांवर समुपदेशन करीत कुटुंबाला एकत्र आणून पती-पत्नीसहित इतर नात्यातील दुरावा संपविण्यात ‘भरोसा सेल’ला यश आले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांकडून १ हजार ६९१ प्रकरणांपैकी ८०२ जणांचे समेट घडवून आणण्यातही सेलला यश आले. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाचा भरोसा असेच या सेलला म्हणता येईल.

Jalna police news
Randeep-Lin Laishram: स्वित्झर्लंड, युरोप नाही तर भारतात 'या' ठिकाणी रणदीप पत्नीसोबत गेलाय हनीमूनला, रोमँटिक व्हिडीओ व्हायरल

अशी आहे आकडेवारी
एकूण दाखल प्रकरणे - २३१२
एकूण प्रकरणांचा निपटारा - २०४४
शिल्लक प्रकरणे - २६८
एकूण घडवून आणलेले समेट - ८०२ (Latest Marathi news)

‘भरोसा सेल’च्या माध्यमातून अनेक कुटुंबांचे समेट करण्यात आले आहे. अनेकजण आपल्या समस्या आणि तक्रारी घेऊन भरोसा सेलकडे येत असतात. नात्यामधील दुरावा कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अनेकदा ही प्रक्रिया लांबलचक असते. मात्र, समुपदेशनातून ते शक्य करता येते. इतक्या मोठ्या प्रमाणात सेलद्वारे प्रकरणांचा निपटारा करणे शक्य झाले हे सेलचे यश म्हटले तर वावगे ठरणार नाही- सीमा सुर्वे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (भरोसा सेल)

Jalna police news
'...त्यांनाच फक्त बोलावण्यात आलंय'; राम मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com