Police : पोलिसांची मोठी कारवाई, सायबर चोरट्यांची खाती गोठवली, सव्वा कोटी मिळवले परत

Cyber Crime: २६ लाख ३० हजार रुपये परत देत, उर्वरित पैसे न देता, त्यांची फसवणूक केली होती.
पोलिसांची मोठी कारवाई, सायबर चोरट्यांची खाती गोठवली, सव्वा कोटी मिळवले परत
nagpur crime Police : sakal
Updated on

Nagpur Crime: शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून व्यावसायीकासह एकाची कोट्यवधींनी फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांची खाते गोठवून सव्वा कोटी रुपयाची रक्कम परत मिळविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली.

मनोज प्रतापचंद बंसल (वय ५०, रा. सिकंदारा आग्रा, उत्तरप्रदेश), राजेशकुमार सियाराम गोयल (वय ५७, रा. गाजीयाबाद, उत्तरप्रदेश), तुषार संजयकुमार गर्ग (वय ३०, रा. नवी दिल्ली), विकास किसनकुमार बंसल (वय ५२, रा. नवी दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर २०२३ ते ८ जानेवारी २०२४ यादरम्यान सायबर चोरट्यांनी बनावट डी-मेट खाते, लिंक आणि व्हॉट्सॲप ग्रुप तयार करीत, त्यातून रामदासपेठ येथील कॅनल मार्गावर राहणाऱ्या मोती किशनचंद दुलारामानी (वय ७८) २ कोटी ७५ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. त्यापैकी २६ लाख ३० हजार रुपये परत देत, उर्वरित पैसे न देता, त्यांची फसवणूक केली होती.

सायबर पोलिसांना त्याबाबत तक्रार दिल्यावर पोलिस उपायुक्त निमित गोयल, साहाय्यक पोलिस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनात, पोलिस निरीक्षक अमित डोळस, साहाय्यक फौजदार दत्तात्रय निनावे, पोलिस हवालदार गजानन मोरे, अंमलदार अजर पवार, योगेश काकड, रोहीत मटाले, सुशील चंगोले यांच्या पथकाने तांत्रिक तपास करीत, त्यांचे खाते गोठविले. त्या खात्यातून न्यायालयीन प्रक्रियेनंतर १ कोटी ७ लाख रुपये त्यांना परत दिले.

याशिवाय गेल्यावर्षी ४ ते ३० जुलैदरम्यान महेश राजेश्‍वर मानकर यांना ‘डोलो’ ॲपच्या माध्यमातून ८ लाख ३८ हजार १५२ रुपयाने सायबर चोरट्याने गंडा घातला होता. त्याचा तपासात सायबर पोलिसांनी बॅंकेशी पत्रव्यवहार करीत, खाते गोठवून त्यांच्याकडून संपूर्ण पैसे परत मिळवून दिले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.