Nagpur Crime: गप्पा मारत असताना क्षुल्लक कारणावरुन पेटला वाद, मेहुण्याने केला जावयाचा खून

मेहुण्याने कौटुंबिक वादातून जावयाला मारहाण करून खून केला. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता बेलतरोडीत घडली.
Nagpur Crime
Nagpur CrimeEsakal

Brother in Laws Killed in Nagpur Crime : मेहुण्याने कौटुंबिक वादातून जावयाला मारहाण करून खून केला. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता बेलतरोडीत घडली. रवी गलीचंद कहार (वय ३०, तिनसई, छिंदवाडा-मध्यप्रदेश) असे मृत युवकाचे नाव आहे. अरुण अन्नू बनवारी (२४, गोरेघाट, ता. लिंगा, जि. छिंदवाडा-मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.

रवी कहार आणि अरुण बनवारी हे दोघेही बांधकाम मजूर आहेत. रवी हा अरुणच्या बहिणीचा पती आहे. दोघांनाही दारुचे व्यसन असून ते शिवनगाव पुनर्वसन येथील रचना गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या इमारतीवर गटार पाईपलाईन खोदण्याच्या कामावर होते. सोमवारी रात्री साडेदहा वाजता दोघेही गप्पा करीत बसले होते.

दरम्यान दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला. त्यामुळे चिडलेल्या अरुणने जावई रवीच्या डोक्यावर दंड्याने हल्ला केला. त्यानंतर रवीला रक्ताच्या थारोळ्यात सोडून आरोपी तेथून पळून गेला. वेळीच उपचार न झाल्याने रवीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी श्याम कहार यांच्या तक्रारीवरून खूनाचा गुन्हा दाखल केला. (Latest Marathi news)

Nagpur Crime
रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट घडवणारा 'तो' संशयित दहशतवादी किनारपट्टीचा रहिवासी; 'इसिस'कडून प्रशिक्षण, सिल्व्हर प्लास्टिक बॉम्बचा वापर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com