
नागपुरमधील नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हान नदी शांती घाटावर एका तरुणीवर अंत्यसंस्कार सुरू असताना मद्यधुंद तरुणाने सरणावर उडी घेण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. तरुणीच्या नातेवाइकांनी या तरुणाला चोप दिल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (ता.९) दुपारी चारच्या सुमारास घडली. अनुराग राजेंद्र मेश्राम (२७) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे.