Nagpur Crime: जखमी विशालचाही उपचारादरम्यान मृत्यू ! तिघांना अटक, आठवडाभरात शहरात आठव्या खुनाची नोंद

नंदनवन पोलिस हद्दीत देशपांडे लेआउटमध्ये दोघांवर फरशीने वार करीत एकाचा खून आणि एकाला जखमी केले. उपचारादरम्यान जखमी विशाल राऊत याचाही मृत्यू झाला.
Nagpur Crime: जखमी विशालचाही उपचारादरम्यान मृत्यू ! तिघांना अटक,  आठवडाभरात शहरात आठव्या खुनाची नोंद

Nagpur Murder Cases: नंदनवन पोलिस हद्दीत देशपांडे लेआउटमध्ये दोघांवर फरशीने वार करीत एकाचा खून आणि एकाला जखमी केले. उपचारादरम्यान जखमी विशाल राऊत याचाही मृत्यू झाला. पोलिसांनी खुनातील तिन्ही आरोपींना अटक केली. आतापर्यंत शहरात आठ दिवसांत आठ खुनांची नोंद केली आहे.

विलास उर्फ मटर रामकृष्ण वानखेडे (रा. हिवरी नगर पॉवरहाऊस जवळ, नंदनवन) त्याचा भाऊ नितीन रामकृष्ण वानखेडे (वय २७,रा. प्लॉट नं. १९१, धरमनगर, भरतवाडा) आणि मित्र शुभम उर्फ चुक्का छोटेलाल बिरहा (वय ३२, रा. धरमनगर, भरतवाडा) याला अटक केली आहे.

शुक्रवारी (ता.९) रात्री तिघांनाही नीरत भोयर आणि विशाल राऊत या दोघांना देशपांडे ले-आउट येथील कल्पतरू अपार्टमेंटजवळ गाठून फरशीने वार करीत जखमी केले. त्यात नीरज याचा जागीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

याशिवाय विशालला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. आज पहाटे विशालचा मृत्यू झाला. दरम्यान आरोपी विलास आणि त्याचा भाऊ नितीन हे दोघेही जयताळा येथील बहिणीच्या घरी असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही अटक केली.

Nagpur Crime: जखमी विशालचाही उपचारादरम्यान मृत्यू ! तिघांना अटक,  आठवडाभरात शहरात आठव्या खुनाची नोंद
Pakistan election results: नवाझ शरीफ होणार चौथ्यांदा पंतप्रधान? सहयोगी पक्षांसोबत काय झाली डील?

अज्जूच्याही मारेकऱ्याला अटक

क्रिकेटच्या वादातून अमन ऊर्फ अज्जू इब्राहिम शेख (वय २३ रा. गुलमोहरनगर) याची चाकूने वार करून हत्या करून फरार झालेला मारेकरी करण बंजारे (वय १९) याला कळमना पोलिसांनी अटक केली. शनिवारी (ता.१०) दुपारी भरतवाडा परिसरात अज्जू व करण मित्रांसोबत क्रिकेट खेळत होते. (Latest Marathi News)

यादरम्यान दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला. करणने चाकूने वार करून अज्जूची हत्या केली व पसार झाला. कळमना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शोध घेऊन करणला अटक केली.

Nagpur Crime: जखमी विशालचाही उपचारादरम्यान मृत्यू ! तिघांना अटक,  आठवडाभरात शहरात आठव्या खुनाची नोंद
Ashok Chavan: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; अशोक चव्हाण ११ आमदारांसोबत भाजपच्या वाटेवर? चर्चांना उधाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com