पत्नीच्या आईला चाकूने भोसकले; प्रेमसंबंधाला विरोधाचा वचपा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीच्या आईला चाकूने भोसकले; प्रेमसंबंधाला विरोधाचा वचपा

पत्नीच्या आईला चाकूने भोसकले; प्रेमसंबंधाला विरोधाचा वचपा

नागपूर : प्रेयसीच्या आईचा प्रेमास विरोध असल्यानंतरही प्रियकराने तिच्याशी लग्न केले. लग्नानंतरही पत्नीच्या आईचा हस्तक्षेप असल्यामुळे पती-पत्नीत वादविवाद होत होते. त्यामुळे युवकाने पत्नीच्या आईला चाकूने भोसकून वचपा काढला. ही घटना जरीपटका येथील हेमू कॉलनी चौकात घडली. सरोज प्रताप खत्री (४५) असे जखमी महिलेचे नाव आहे.

लविशा विशाल शर्मा (२०) हिचे दुर्ग येथील विशाल विनोद शर्मा (२८) याच्यासेाबत प्रेमसंबंध होते. त्यांना लग्न करायचे होते. परंतु, लविशाची आई सरोज खत्री यांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. परंतु, लविशा ही निर्णयावर ठाम असल्याने शेवटी तिच्यापुढे आई-वडिलांना झुकावे लागले. २० जून २०२० ला त्यांचे लग्न झाले होते.

तीन ते चार महिने त्यांचा सुखाने संसार झाला. त्यानंतर लविशा हिला तिचा पती विशाल हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असून त्याच्यावर छत्तीसगड पोलिसात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समजले. त्यावरून त्यांच्यात खटके उडू लागले. विशाल हा लविशाला मारहाण करीत होता. त्यामुळे तिने ही माहिती आई-वडिलांना दिली. लविशाचे वडील दुर्गला गेले आणि २६ जुलैला तिला नागपूरला आणले.

हेही वाचा: शेतकऱ्याने साधली अर्थक्रांती; शेतीतून साडे सोळा लाखांचे उत्‍पन्न

लविशा नागपूरला आल्याने विशाल संतप्त झाला होता. शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास भाऊ आकाश आणि आई मिना शर्मा यांना घेऊन कारणे विशाल जरीपटका येथे आला. त्यावेळी लविशा ही तिची बहीण व वडिलासोबत दवाखान्यात गेली होती. घरी फक्त लविशाची आई सरोज होती. विशालला पाहून सासूचे डोके भडकले. सासूने विशालसोबत वाद घालायला सुरुवात केली. विशालने चाकू काढून सासू सरोजच्या डोक्यावर, दंडावर, खांद्यावर मारून गंभीर जखमी केले आणि तिघांनीही कारमधून पळ काढला.

‘तेरे मॉं का गेम किया’

सासूच्या पोटात चाकू भोसकून तो पळून जात असताना लविशा ही बहिणीसोबत ई रिक्षाने येताना दिसली. त्यावेळी विशालने तिला रस्त्यात अडवून ‘जो मैने बोला था वो कर दिखाया, तेरे मॉं का मैने गेम किया’ असे बोलून तो निघून गेला. घरी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गंभीर अवस्थेत सरोज यांना मेयो रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे एक पथक दुर्ग रवाना झाले आहे.

Web Title: Nagpur Crime News Knife Attack Attack On Wifes Mother Opposing A Love Affair

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..