esakal | कर्तृत्वाला नसते वयाचं बंधन : जुळ्या बहिणींनी वयाच्या अकराव्या वर्षी उभा केला व्यवसाय
sakal

बोलून बातमी शोधा

जुळ्या बहिणींनी वयाच्या अकराव्या वर्षी उभा केला व्यवसाय

जुळ्या बहिणींनी वयाच्या अकराव्या वर्षी उभा केला व्यवसाय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : ‘लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा’ अशी म्हण प्रचलित आहे. लहानपणी कुठलेही टेन्शन नसल्याने जवळपास सगळ्यांनाच ते हवेहवेसे वाटते. अशा लहान वयात खेळणे, बागडणे हाच उद्योग मुलांना असतो. थोडं मोठं झाले की, अभ्यास आणि मग सुरू होते, ती शाळेची धावपळ. मात्र, या वयात एखादा बेकरीचा व्यवसाय उभा करून प्रगतिपथावर घेऊन जाणे आश्चर्यकारक आहे. कर्तृत्वाला वयाचं बंधन नसतं. अंगी असलेले कर्तृत्व आणि जिद्द यातून कुठलीही गोष्ट साध्य होते. हे या बहिणींनी दाखवून दिले. इशिता आणि सान्या चढ्ढा असे या जुळ्या बहिणींचे नाव आहे. कर्तृत्व आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर वयाच्या अकराव्या वर्षापासून व्यवसाय उभा करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. (Twin-sisters-Start-Business-dairy-products-Social-Media-nad86)

बेकरी, केक, पेस्ट्री आणि बेक फुडला मोठी मागणी आहे. आजही बऱ्याच घरी मोठ्या आवडीने हे पदार्थ खाल्ले जातात. शिवाय मोठ-मोठे हॉटेल्स आणि बेकरीच्या दुकानात या प्रॉडक्ट्सला मागणी आहे. लहान मुलांपासून तर तरुणाईमध्येयाची बरीच क्रेझ आहे. त्यामुळे छोट्यापासून तर मोठ्या हॉटेल्समध्ये या प्रॉडक्ट्सची रेलचेल असते. अगदी पाहुण्यांच्या स्वागतासाठी अनेक घरांमध्ये कुकीज पेस्ट्री आणि बेक फुडची मागणी असते. याशिवाय पिझ्झा, बर्गर यासारखे पदार्थही अनेकांच्या तोंडाला पाणी सोडते.

हेही वाचा: अमरावती : वाहनातून साडेतीन कोटींची रक्कम पकडली, सहा जण ताब्यात

या खाद्यपदार्थांची विक्री विविध रेस्टॉरण्टमध्ये होताना दिसून येते. आजकाल ऑनलाइनच्या जमान्यात त्या वस्तू ऑडर करून घरपोच मागविण्याची सोय झालेली आहे. त्यामुळे यामध्ये व्यवसाय करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मात्र, गर्दीत आपले वेगळे स्थान तयार करण्याचे काम इशिता आणि सान्या चढ्ढा यांनी केले आहे. बुकिंगमध्ये आवड असल्याने वयाच्या आठव्या वर्षीच इशिता आणि सान्या चढ्ढा यांनी संपूर्ण स्वयंपाक शिकून घेतला. यानंतर विविध पदार्थ तयार करण्यासही त्यांनी सुरुवात केली.

केवळ छंद म्हणून इशिता आणि सान्या या विविध उत्पादन तयार करायच्या. मात्र, कधी याचा व्यवसाय करून त्यातून पैसे कमाविता येईल, असे कधीही ध्यानीमनी आले नाही. विशेष म्हणजे त्यांनी तयार केलेल्या बेकरी, केक आणि बेक फुड इतका प्रतिसाद मिळेल, याचा स्वप्नात विचारही केला नव्हता. मात्र, त्यांच्यातील प्रतिभेला कलाटणी मिळाली. एकदा रामनगर येथील फुड पार्क येथील ‘एक्झीबिशन'मध्ये इशिता आणि सान्याने स्टॉल लावले. यात आपले बेकरी प्रॉडक्ट्स विकायला ठेवले. या स्टॉल्समध्ये ठेवलेल्या विविध प्रॉडक्ट्स तिथे येणाऱ्या लोकांना आवडले. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी तयार केलेल्या पदार्थांची चव भन्नाट असल्याचे सांगून सर्वांनी त्याचे कौतुकही केले.

यानंतर दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात स्टॉल लावण्यास सुरुवात केली. केंद्रात त्यांच्या बेकरी, केक आणि बेक फुड या खाद्यपदार्थ्यांना मागणी वाढली. यातूनच हे प्रॉडक्ट्स विक्री करण्याचा व्यवसाय करून त्यातून बऱ्यापैकी ‘अर्निंग’ मिळविता येईल, असा विचार मनात डोकावला. मग सुरू झाली ती त्या दृष्टीने वाटचाल. छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू केला. आलेल्या ऑर्डर तयार करून देण्यास सुरुवात केली. मात्र, स्वतःचा ब्रॅण्ड विकसित करण्यासाठी काहीतरी वेगळे देण्याच्या उद्देशाने इशिता आणि सान्या यांनी छोटे-छोटे बुकिंग क्लासेस केले. त्यात नवनवे पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: मेळघाटात वाघांची संख्या अर्धशतकावर; संवर्धनात ‘टॉप थ्री’मध्ये

विविध खाद्यपदार्थ तयार करण्यात त्या निपुण झाल्या. याचाच फायदा घेत त्यांनी केक, बेकरी प्रॉडक्टस तयार करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी बंगरुळू येथून विशेष प्रशिक्षण घेतले. पुढे या वाटचालीतून त्यांनी ‘डिलीशिअस डेव्हील’ हा ब्रॅण्ड विकसित केला. यातूनच त्यांनी व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. आज त्यांनी तयार केलेल्या पदार्थाला ऑनलाइन बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यांच्याकडे ऑर्डर नोंदवीत, आवडीने खाद्यपदार्थ मागवितात. त्यांनी तयार केलेले बेकरी प्रॉडक्ट्स आता बरेच लोकप्रिय झालेत. त्यांच्या या अफाट इच्छाशक्ती आणि मेहनतीने इतक्या कमी वयात व्यवसायास सुरुवात करीत यशोशिखर गाठले.

सोशल मीडियावर ‘डिलीशिअस डेव्हील’ची धूम

व्यवसायाला उभारी देण्यासाठी त्याचे मार्केटिंग करणेही तेवढच महत्त्वाचे असते. इशिता आणि सान्या चढ्ढा यांनी तयार केलेले केक, बेकरी प्रॉडक्टस सोशल मीडियावर टाकण्यास सुरुवात केली. वैविध्यपूर्ण बनावट आणि आकर्षक सजावटीमुळे त्यांच्या प्रॉडक्ट्सला ऑनलाइन मागणी वाढू लागली. ऑनलाइन ऑर्डर घेत ते तयार करून देण्याच्या व्यवसायात त्यांनी चांगलाच जम बसविला. आज फेसबूक, इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूबवर त्यांच्या केक, बेकरी प्रॉडक्टसची धूम आहे.

(Twin-sisters-Start-Business-dairy-products-Social-Media-nad86)

loading image
go to top