Nagpur Crime News : मुलगा व पत्नीने केला पतीचा खून Nagpur crime news Son and wife killed husband | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Crime News

Nagpur Crime News : मुलगा व पत्नीने केला पतीचा खून

नागपूर : चारित्र्यावर संशय घेत नवरा चाकू घेऊन पत्नीच्या मागे धावला. परंतु, पत्नीने मुलाच्या मदतीने चाकू हिसकून घेत नवऱ्यावर सपासप वार केले.

वाराने गंभीर जखमी झालेल्या पतीचा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात खुन्हाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कळमना येथील बजरंग नगरात ७ मार्चच्या रात्री घडली होती.

कळमना भागातील बजरंग नगरात राहणारे ४० वर्षीय प्रताप नामदेव कुळमेथे यांनी चारित्र्यावर संशय घेत वाद घातला. प्रकरण विकोपाला गेल्याने प्रताप यांनी चाकू घेत पत्नीच्या मागे धावले. झटापटीत पत्नीच्या हाताला चाकूचा मार लागला.

यानंतर पत्नी चंदा प्रताप कुळमेथे यांनी विधीसंघर्षग्रस्त मुलासोबत संगणमत करीत प्रताप यांच्या हातातील चाकू हिसकला आणि पोटावर वार केले. (Latest Marathi News)

जखमी झालेल्या प्रताप यांना मेयोत दाखल केले. पतीला दारू पिण्याची सवय असल्याने अंगणात पडल्याचे आरोपीने खोटे सांगितले. उपचार सुरू असताना १५ मार्चला प्रताप यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी कळमना पोलिस ठाण्यात मर्ग दाखल केला होता. या प्रकरणाची चौकशी आणि वैद्यकीय अहवालानुसार प्रताप यांना जीवे मारल्याचे उघड झाल्याने दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांचा तपास सुरू आहे.

टॅग्स :NagpurpolicecrimeSakal