Nagpur News: ऑनलाइन फसवणुकीवर लागणार लगाम

प्राध्यापकांनी विकसित केले मॉडेल संशोधनासाठी जर्मनीचे पेटंट
 डिजिटल युगात सायबर चोरट्यांकडून आपले खाते आणि मोबाईल हॅक
डिजिटल युगात सायबर चोरट्यांकडून आपले खाते आणि मोबाईल हॅकsakal

Nagpur News : डिजिटल युगात सायबर चोरट्यांकडून आपले खाते आणि मोबाईल हॅक करून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहे. चोरट्यांकडून ग्राहकांचा ओटीपी सहजरित्या मिळवून त्यांच्या खात्यातून पैसे वळते केल्याचे प्रकारही सातत्याने घडताना दिसून येतात.

मात्र, या प्रकारांना आळा घालण्यासाठी सहा प्राध्यापकांनी एकत्र येत संशोधन करीत, एक मॉडेल विकसित केले असून त्यामुळे अशा प्रकारांवर आता लगाम लावणे शक्य होणार आहे.

 डिजिटल युगात सायबर चोरट्यांकडून आपले खाते आणि मोबाईल हॅक
Nagpur : DPC ३०० कोटी जाणार परत, स्थगितीचा फटका

व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद करीत, त्यांना विविध आमिष आणि फंडे देत, फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने घडताना दिसून येतात. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होताना दिसून येते.

विशेष म्हणजे, त्यातून गेलेले पैसे परत मिळेल याची शाश्‍वती नसते. अशा अनेक तक्रारी सायबर पोलिसांकडे दाखल होतात. विशेष म्हणजे हे प्रकार होत असताना,

संबंधित नागरिकांद्वारे ‘ओटीपी’ मिळवून बॅंकेतून ट्रान्जेक्शन करीत, संपूर्ण रक्कम सायबर चोरटा आपल्या खात्यात वळते करताना दिसून येतो. ओटीपी शेअर न करताही अनेकदा मोबाईल हॅक करीत, त्यातून असे प्रकार होत असल्याची बाब निदर्शनास येते.

त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी डॉ. दिवाकर त्रिपाठी, डॉ. मनीष देशपांडे, डॉ. उज्ज्वल लांजेवार, डॉ. देबाशिस दास, डॉ. लीलाधर रेवतकर आणि प्रा. अतुल आकोटकर यांनी ‘ई-ऑथेंटिकेशन सिस्टम बेस्ड ऑन आर्टिफिशियल इंटेलिजेंस, बिग डेटा ॲण्ड साइबर सिक्युरिटी यूजिंग क्युआर कोड ॲण्ड ओटीपी’ हे मॉडल विकसित केले आहे.

या मॉडलच्या माध्यमातून कुठलेही ट्रान्जेक्शन करताना केवळ ओटीपी नाही तर क्युआर कोडचीही आवश्‍यक असतो.

त्यामुळे जोपर्यंत त्या व्यक्तीद्वारे क्युआर कोड डिकोड केल्या जात नाही, तोपर्यंत कुठलेही ट्रान्जेक्शन होत नाही. त्यातून अशा ऑनलाइन फसवणुकीपासून वाचता येणे शक्य होणार आहे. या मॉडेलला फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीने पेटंट देऊनही सन्मानित केले आहे.

डेटाही राहणार सुरक्षित

अनेकदा मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करीत असताना एपीके फाईल्सच्या माध्यमातून आपला डेटा मिळत असतो. मात्र, या मॉडेलच्या माध्यमातून तो डेटाही सुरक्षित करता येणे शक्य आहे. जेणे करून तो डेटा कोणत्याही सायबर चोरट्याच्या हाती लागणार नाही.

 डिजिटल युगात सायबर चोरट्यांकडून आपले खाते आणि मोबाईल हॅक
Solapur : बाघेश्वरबाबांना सोलापूरात येण्याचं निमंत्रण; राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर टीकेची झोड

ऑनलाइन फसवणुकीचा वाढता टक्का बघता, त्यापासून डेटा आणि होणारा आर्थिक व्यवहार सुरक्षित करण्यासाठी हे मॉडेल प्रभावी ठरणारे आहे. या वैशिष्ट्यामुळेच या मॉडेलला पेटंट मिळालेले आहे.

प्रा.अतुल आकोटकर

 डिजिटल युगात सायबर चोरट्यांकडून आपले खाते आणि मोबाईल हॅक
Nagpur : DPC ३०० कोटी जाणार परत, स्थगितीचा फटका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com