Nagpur Crime : फार्मसीच्या नावाने कोटीची फसवणूक, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल; एकाला अटक, एक फरार

जरिपटका येथे फार्मसीचे काम सुरू केल्याचे आणि नंदनवन येथे एक फार्मसी खरेदी एका फार्मा कंपनीचे शेअर खरेदीसाठी पैसे मागितले.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

Nagpur Crime - विदेशात राहणाऱ्या एका महिला डॉक्टरला नागपुरात फार्मसी सुरू करायची होती. पण यासाठी करार करताना बनावट कागदपत्रे तयार करीत तिची ९९ लाख ४९ हजारांनी फसवणूक केली आहे.

याप्रकरणी डॉ. पल्लवी जयंत चोपडे (वय ४० रा. टेक्सास, अमेरिका) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नीलेश ज्ञानेश्‍वर गायकवाड (वय ३० रा. मिलिंगनगर, आंबेडकर मार्ग, पाचपावली), डॉ. मधुलिका बुद्धपाल बागडे (वय २८ रा. नागभुमी सोसायटी, मिसाळ ले-आऊट) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. पल्लवी चोपडे या २००८ पासून अमेरिकेमध्ये नोकरी करतात. त्यांना भविष्यात नागपुरात स्थायित व्हायचे असल्याने त्यांना नागपुरात बिझनेस, पॅरामेडिकल अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी गुंतवणूक करायची होती.

Crime News
Pune Crime : आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने सख्ख्या भावाकडूनच हत्याराने वार

पल्लवी यांच्या मावस सासूची मुलगी डॉ. मधुलिका बागडे यांच्या ओळखीचा एक जण असून तो बिझनेस, पॅरामेडिकल अभ्यासक्रमाच्या मान्यतेसाठी मदत करीत असल्याचे समजले. मधुलिकाने नीलेशची ओळख करून दिली.

तो ‘एहसास’ नावाची स्वयंसेवी संस्था चालवित असल्याचे त्याने सांगितले. डॉ. पल्लवी यांनी त्याचेशी कमाल चौकातील एका रेस्टारेंटमध्ये बैठक घेतली. बैठकीला डॉ. मधुलिकाही होत्या. काहीच दिवसांनी नीलेश हा मधुलिकाचा होणारा पती असल्याचे डॉ. पल्लवी चोपडे यांना कळाले. तिने पैशाची हमीही घेतली.

Crime News
Mumbai News : कामगारांच्या कुटुंबांना दिलासा! अंधेरीतील कामगार रुग्णालय पुन्हा सुरू होणार

खोट्या कंपन्या दाखविल्या

२०२१ साली निलेशने पॅरामेडिकल अभ्यासक्रमाच्या संस्थेचे व ड्रग परवाना मिळाल्याची माहिती दिली. त्यासाठी सहा लाखही मागितले. तसेच कोर्सच्या मान्यतेसाठी पाच लाख दिले. तसेच ‘प्रसन्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल ॲण्ड पॅरामेडिकल सायन्स’ या नावाने संस्था सुरू केली.

जरिपटका येथे फार्मसीचे काम सुरू केल्याचे आणि नंदनवन येथे एक फार्मसी खरेदी एका फार्मा कंपनीचे शेअर खरेदीसाठी पैसे मागितले. त्यापैकी त्याने नंदनवनच्या फार्मसी मालकाच्या खोट्या सह्या असलेले प्रतिज्ञापत्रही पाठविले.

Crime News
Mumbai : मुंबईत भाजपाचे वाढले बळ! ठाकरेंच्या शिवसेनेसमोर खडतर आव्हान

वेळोवेळी पैसे मागत असल्याने आली शंका

कंपनीत मालाच्या खरेदीसाठीही नीलेश वारंवार पैसेही मागायचा. पल्लवी यांनी त्याच्या खात्यात वेळोवेळी ९९ लाख ४९ हजार टाकले. अखेर पल्लवी यांना शंका आलीच. त्यांनी भावाला चौकशी करण्यास सांगितले असता कुठेही इन्स्टिट्यूट वा फार्मसी नसल्याचे आढळून आले.

त्यामुळे डॉ. पल्लवी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत, डॉ. मधुलिका यांना अटक केली. त्यांना न्यायालयातून जामीन मिळाला असून नीलेश गायकवाडचा शोध सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.