Nagpur : अवैधरित्या मुरूम उपसा करणे भोवले; परंतु आरोपी ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरसह पळ काढला

यावेळी विना क्रमांकाचे जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने विनापरवाना धरणातून अवैधरित्या मुरूम उपसा करून मुरूमाची चोरी होत असल्याचे दिसून आले.
Nagpur
Nagpursakal
Updated on

Nagpur - तालुक्यातील धामणगाव देशमुख येथील धरणातून जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैधरित्या मुरूम उपसा करणारे जेसीबी मालक, जेसीबी चालक व ट्रॅक्टर चालक अशा तिघांविरुद्ध बोराखेडी पोलिसांनी शुक्रवारी ७ जुलै रोजी गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील जयपूर येथील तलाठी नितीन सोपान धाडे (३७) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, मोताळा तहसीलदार देवेंद्र कुऱ्हे यांच्या आदेशावरून फिर्यादी व कोथळी येथील तलाठी विकास दळवी यांच्या पथकाने बुधवारी ५ जुलैच्या सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास धामणगाव देशमुख येथील धरण परिसरात धडक दिली.

Nagpur
Mumbai: मुंबईकरांचं पाणी कपातीचं टेन्शन वाढलं! धरणात ७६ दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक

यावेळी विना क्रमांकाचे जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने विनापरवाना धरणातून अवैधरित्या मुरूम उपसा करून मुरूमाची चोरी होत असल्याचे दिसून आले.

महसूल विभागाच्या पथकाने ट्रॅक्टर चालकास थांबवले. परंतु आरोपी ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर-ट्रॉलीसह पळ काढला. त्यानंतर पथकाने विना क्रमांकाच्या जेसीबीची चावी काढली व जेसीबी चालकाला बोराखेडी पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले.

Nagpur
Mumbai : मुंबईत भाजपाचे वाढले बळ! ठाकरेंच्या शिवसेनेसमोर खडतर आव्हान

परंतु जेसीबी चालकाने दुसऱ्या चावीने जेसीबी सुरू करून जेसीबी घेऊन पळून गेला. दरम्यान, महसूलच्या पथकाने सदर प्रकाराची वरिष्ठांना माहिती दिली. तसेच कोथळी गावात या जेसीबी व ट्रॅक्टरबाबत चौकशी केली असता, जेसीबी अब्दुल जमील अब्दुल रशीद (रा. कोथळी) यांच्या मालकीचा असल्याचे समजले.

या प्रकरणी उपरोक्त तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी जेसीबी मालक अब्दुल जमील अब्दुल रशीद, आरोपी जेसीबी चालक व विना नंबरच्या ट्रॅक्टर-ट्रॉली चालक या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एएसआय यशवंत तायडे, पोकाँ सुनील भवटे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.