.Ladkhed Crime, Woman Dies, Sword Attack
ESakal
नागपूर,: पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने मारहाण करीत, खून केल्याची धक्कादायक घटना कामगारनगरातील न्यू म्हाडा कॉलनी परिसरात गुरुवारी (ता.१) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. कपिल पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. लक्ष्मी रोशन शाहाकार (वय ३३, रा. न्यू म्हाडा कॉलनी, कामगारनगर) असे मृत पत्नीचे तर रोशन किशोर शाहाकार (वय ४२) असे आरोपीचे नाव आहे.