
Nagpur Crime: एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या दोन जीवांची घालमेल काहीतरी मोठं घडल्याशिवाय इतरांना कळू शकत नाही, असं बऱ्याचदा लेखक मंडळी पुस्तकांतून, चित्रपटांतून सांगू पाहत असतात. पण अशीच चित्रपटाची कथा वाटावी अशी एक घटना नागपुरात घडली आहे.
प्रेयसीनं मृत्यूला कवटाळल्यानं खचलेल्या तिच्या प्रयकरानं मागचा पुढचा विचार न करता थेट तिच्या चितेमध्येच उडी घेण्याचा प्रयत्न केला. पण अशा दुःखद प्रसंगी तमाशा नको म्हणून मुलीच्या कुटुंबियांनी त्या तरुणाला चोप दिला. यामध्ये तो जखमी झाला असून त्याच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.