Nagpur Cyber Crime: नागपुरात सायबर चोरांची वाढली हिम्मत! माजी पोलिस महासंचालकाच्या नावाने लुबाडण्याचा प्रयत्न

शहर परिसरात सायबर गुन्हेगारांची हिम्मत चांगलीच वाढली असून त्यानी चक्क माजी पोलिस महासंचालकांच्या नावाने लुबाडणूक करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
Nagpur Cyber Crime: नागपुरात सायबर चोरांची वाढली हिम्मत! माजी पोलिस महासंचालकाच्या नावाने लुबाडण्याचा प्रयत्न

Nagpur Cyber Fraud: शहर परिसरात सायबर गुन्हेगारांची हिम्मत चांगलीच वाढली असून त्यानी चक्क माजी पोलिस महासंचालकांच्या नावाने लुबाडणूक करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संतोष कुमार (रा. आझमगड, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. त्याने दोन-तीन दिवसांपूर्वी भूषण कुमार उपाध्याय यांच्या नावाने योगेश ताले (४३, रा. गरोबा मैदान) यांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.ते योगेशच्या फ्रेंड रिक्वेस्टमध्ये आधीपासूनच आहे.

पुन्हा विनंती आल्यावर योगेशने रविवारी ती स्वीकारली. त्यानंतर सायबर गुन्हेगाराने योगेशशी ऑनलाइन चॅटिंग केले. व्हॉट्सॲप नंबरवर बोलणे झाले. एसएपीएफमध्ये तैनात असलेल्या त्याच्या मित्राची जम्मू-काश्मीरमध्ये बदली झाल्याने घरातील फर्निचर विकावे लागल्याचे त्याने सांगितले होते. (Latest Marathi News)

तसेच २ ते लाखांच्या फर्निचरचे फोटो व्हॉट्सॲपवर टाकून ते ८५ हजारात देण्याची तयारी दर्शविली. झाला. योगेशने यांनी भूषण कुमार यांना या प्रकाराची माहिती दिल्याने आरोपीचे बिंग फुटले.

Nagpur Cyber Crime: नागपुरात सायबर चोरांची वाढली हिम्मत! माजी पोलिस महासंचालकाच्या नावाने लुबाडण्याचा प्रयत्न
Pune News : हॉटेल, पबवर राहणार पोलिस पथकांचा ‘वॉच’ ; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

यापूर्वी माजी पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल यांच्या नावानेही फसवणुकीचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असून सायबर पोलिस यंत्रणा ॲक्टिव्ह झाली आहे. (Latest Marathi News)

Nagpur Cyber Crime: नागपुरात सायबर चोरांची वाढली हिम्मत! माजी पोलिस महासंचालकाच्या नावाने लुबाडण्याचा प्रयत्न
World Social Justice Day 2024 : जागतिक सामाजिक न्याय दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्व

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com