

Nagpur Electric Pole
sakal
नागपूर : शहरातील रस्त्यांवर उभे असलेले विजेचे खांब सध्या नागरिकांच्या जिवाला धोका ठरत आहेत. अयोध्यानगर, जवाहरनगर, जुना सुभेदार आणि शारदा चौक या परिसरातील अनेक ठिकाणी हे खांब गंजलेले, वाकलेले व तारा सैल झालेल्या दिसतात. पावसाळ्यात या खांबांमधून अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता वाढली आहे.