नागपूर : पेट्रोल महागल्याने सायकलची डिमांड वाढली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol

नागपूर : पेट्रोल महागल्याने सायकलची डिमांड वाढली!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः इंधन दरवाढ, कामगाराचे वाढलेला पगार आणि कच्च्या मालाच्या दरात झालेली वाढीमुळे सगळ्याच प्रकाराच्या सायकलच्या किमती सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागीलवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना बाहेर जाण्याची मुभा नव्हती. हेल्थ क्लब, व्यायामशाळा, गार्डन सर्वच बंद असल्याने तंदुरुस्तीसाठी अनेकांनी सायकलला पसंती दिली होती. त्यामुळे गेल्यावर्षी सायकलच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली होती. यंदा त्यात घसरण झाली असून हळूहळू दरात वाढ झाल्याने सायकल घेण्याचे अनेकांचे गणित कोलमडले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून सायकलींच्या भावात वाढ झाली नव्हती. ही वाढ अपेक्षित होती. इतर वस्तूंचे ज्या प्रमाणात भाव वाढले आहेत, त्या प्रमाणात सायकलचे भाववाढीचे प्रमाण कमीच आहे. मात्र, सर्वसाधारण नागरिकांच्या हक्काचे वाहनही महागल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आरोग्याचे महत्त्व समजले आहे. हिवाळा हा व्यायामासाठी उत्तम हंगाम समजला जातो. पुरुष, महिला व लहान मुले या वर्गातून सायकलींस विशेष मागणी वाढते आहे. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी रस्त्यांवर फिरणाऱ्याची संख्या वाढलेली दिसू लागली आहे. इंधन दरवाढ आणि कच्च्यामालाच्या दरात वाढ झाली आहे. लोखंडाचे दरातही विक्रमी वाढ झालेली आहे. सोबतच ई-सायकलसाठी लागणाऱ्या लिथियम आयर्न बॅटरीच्या किमतीही वाढल्याने सायकलच्या किमती वाढल्या आहेत. लिथियम हे चीन, अमेरिका येथून आयात केले जाते. सायकल तयार करण्यासाठी स्टील, रबर, अल्युमिनियम, प्लास्टिक यांच्या किमती वाढल्या असल्या, तरी सायकलच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण डिझेलच्या किमतीत झालेली वाढ हे आहे. डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम ट्रान्सपोर्टवर झाला आहे. स्टीलची किंमत वाढली असून, अन्य कच्च्या मालाचेही दर वाढलेले आहे असेही सायकल व्यावसायिक म्हणाले.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

किंमत मार्च नोव्हेंबर

साधी सायकल ४००० ५५००

रेंजर सायकल ४५०० ६०००

इलेक्ट्रिक सायकल २५००० २९०००


"सायकलसाठी लागणारा कच्चा माल, डिझेलच्या वाढलेल्या किमती, परिणामी वाढलेला ट्रान्स्पोर्ट खर्च, त्याचबरोबर लिथियम आयर्न बॅटरीच्याही किमती वाढल्याने सायकलच्या किमतीत वाढ झाली आहे."

- राजेश सावडिया, सायकल व्यावसायिक

loading image
go to top