mpsc exam
mpsc examesakal

Nagpur : पंधराशे विद्यार्थ्यांसाठी एकच संस्था

महाज्योती निर्णय : एमपीएससीसाठी विद्यार्थ्यांकडून आणखी पर्याय देण्याची मागणी
Published on

नागपूर : महाज्योतीच्या वतीने एमपीएससीच्या पूर्व प्रशिक्षणासाठी पुन्हा एकदा पुण्यातील ज्ञानदीप ॲकॅडमीची निवड करण्यात आली आहे. ही संस्था जवळपास १५०० विद्यार्थ्यांना ऑफलाइन प्रशिक्षण देणार आहे. मात्र, ‘एमपीएससी’ने ‘यूपीएससी’च्या धर्तीवर त्यांच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. तेव्हा एकच संस्था १५०० विद्यार्थ्यांना कसे काय? प्रशिक्षण देईल, असा प्रश्‍न उपस्थित करीत, ‘यूपीएससी’प्रमाणेच ‘एमपीएससी’ साठीही विद्यार्थ्यांना किमान तीन प्रशिक्षण संस्थांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

 mpsc exam
Nagpur : राजकीय ‘संगीत खुर्ची’चा खेळ रंगणार

मागील वर्षी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी ज्ञानदीप अकादमी पुणे यांची निवड करण्यात आली होती. यंदा विद्यार्थ्यांना ऑफलाइन माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. मात्र, त्यांना कुठल्या संस्थेतून प्रशिक्षण दिले जाईल हे आतापर्यंत निश्चित नव्हते. ‘महाज्योती’ने ‘एमपीएससी’ने नुकताच ‘यूपीएससी’च्या धर्तीवर त्यांच्या अभ्यासक्रमात बदल केला. त्यामुळे ‘यूपीएससी’प्रमाणेच ‘एमपीएससी’ साठीही विद्यार्थ्यांना किमान तीन प्रशिक्षण संस्थांचा पर्याय दिला जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु महाज्योतीने आज पत्र काढून ज्ञानदीप अकादमी पुणे या संस्थेला पूर्व प्रशिक्षणाची जबाबदारी दिली.

 mpsc exam
Nagpur : जन्मठेपेच्या आरोपातून प्रा.साईबाबा निर्दोष मुक्त

‘एमपीएससी’च्या अभ्यासक्रमात मोठा बदल करण्यात आला असून २७ वैकल्पिक विषय आहेत. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळ्या वैकल्पिक विषयाची निवड करतो. एकाच शिकवणीमध्ये या सर्व विषयांचे प्रशिक्षण मिळणेही कठीण आहे. हाच मुद्दा ‘यूपीएससी’च्या विद्यार्थ्यांचाही असल्याने ‘महाज्योती’ने त्यांना तीन प्रशिक्षण वर्गाचा पर्याय दिला. असे असताना ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना एकाच प्रशिक्षण केंद्राच्या दावणीला का बांधले जात आहे? असा प्रश्न उपस्थित करीत किमान तीन प्रशिक्षण संस्थांचा पर्याय द्यावा, अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून होत आहे.

 mpsc exam
Nagpur : गायब सफाई कर्मचारी बडतर्फ

एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना एकाच प्रशिक्षण केंद्राची निवड केल्याने विद्यार्थ्यांना न्याय मिळेल काय? असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे पुण्यात इतर संस्था असतानाही एकाच संस्थेचा समावेश न करता किमान तीन प्रशिक्षण संस्थांचा पर्याय द्यावा.

- कश्‍यप ईश्‍वरकर, विद्यार्थी.

 mpsc exam
Nagpur : रस्ते, बांधकामाची कामे रद्द

स्थगिती दिल्यावरही पुन्हा निवड

महाज्योतीने ६ ऑक्टोबरला पत्र काढत विद्यार्थ्यांना ‘एमपीएससी’ प्रशिक्षणासाठी ज्ञानदीप अकादमी पुणे येथे प्रशिक्षणासाठी कागदपत्रांची तपासणी व छायांकित प्रत जमा करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, चार दिवसांतच म्हणजे १० ऑक्टोबरला कुठल्याही आधाराविना नवीन पत्र काढून ज्ञानदीप अकादमीमध्ये कागदपत्र जमा करण्यास स्थगिती दिली. असे असताना पुन्हा चार दिवसांत पुन्हा त्यात संस्थेलाच प्रशिक्षणाची जबाबदारी दिल्याने विद्यार्थीही संभ्रमात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com