

Nagpur News
sakal
नागपूर : शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबर येथील रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा, सक्षम परिवहन यंत्रणा, जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व आरोग्याच्या सुविधा यावर प्राधान्याने भर देऊन विकासाचा एक आदर्श मापदंड निर्माण करू, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.