Nagpur villagers awaiting disaster management kits amid rising flood threat : नागपूर : पूर व अन्य नैसर्गिक आपत्तींमध्ये तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी आपदा मित्र व ग्रामसेवकांना प्रशिक्षण दिले. मात्र, प्रत्यक्षात वापरासाठी आवश्यक असणाऱ्या ‘व्हिलेज किट’चा पुरवठा अद्याप पूर्ण झालेला नाही. जिल्ह्यातील १५१ गावांसाठी किट मंजूर करण्यात आले होते. मात्र, ९१ गावांना अद्यापही त्याची प्रतीक्षाच आहे. जिल्हा परिषदेच्या पातळीवर १५१ गावांसाठी हे किट मंजूर करण्यात आले होते, त्यापैकी केवळ ६० गावांपर्यंत साहित्य पोहोचले आहे. उर्वरित ९१ गावे अजूनही प्रतीक्षेत आहेत.