नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा तब्बल ४९ दिवसानंतर मृत्यू...

साठ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद
Coronavirus death
Coronavirus death sakal

नागपूर : खासगी रुग्णालयात (Private hospital) उपचार घेत असलेल्या साठ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीच्या (corona-infected person) मृत्यूची नोंद नववर्षात नोंदवली. नागपूर जिल्ह्यात (Nagpur district) कोरोनाचा तब्बल ४९ दिवसानंतर मृत्यू झाला. मृत्यू झालेला रुग्ण जिल्ह्याबाहेरचा आहे, मात्र नागपुरात दगावल्याने जिल्ह्यात नोंद झाली आहे. शनिवारी (ता.१)दिवसभरात ५४ जणांना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे.

Coronavirus death
Chopper Crash : चूक इथं झाली? लवकरच समोर येणार अहवाल

नागपूर जिल्ह्यात १२ नोव्हेंबर २०२१ रोजी एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली होती. तेव्हापासून कोरोनाबाधिताचा मृत्यू नागपुरात झाला नाही. दगावलेला रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. जिल्ह्यात २७ ऑक्टोबरला ग्रामीणमध्ये एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याबाहेरील व्यक्तीचा उपचारादरम्यान नागपूरात मृत्यू झाला होता. तब्बल ४९ दिवसानंतर शनिवार १ जानेवारी २०२२ रोजीही जिल्ह्याबाहेरीलच रुग्णाचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या १० हजार १२३ वर पोहचली आहे. शनिवारला मृत्यू झालेला सदर कोरोनाबाधित रुग्ण हा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला वृध्द असून, त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होता. उपचारादरम्यान नागपुरातच मृत्यू झाल्याची माहिती नागपूर महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली. शनिवारी शहरात ३०४५ व ग्रामीणमध्ये १६१७ अशा जिल्ह्यात ४६६२ चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी शहरातून ४७, ग्रामीणमधून ५ व जिल्ह्याबाहेरील २ अशा ५४ जणांचे अहवाल सकारात्मक आढळून आलेत. दिवसभरात शहरातून २ व ग्रामीणमधून १ असे ३ जण बरे होऊन घरी परतले. आज घडिला शहरात २८७, ग्रामीणमध्ये २६ व जिल्ह्याबाहेरील ८ असे ३२१ सक्रिय रुग्ण आहेत.

Coronavirus death
BCCI अधिकाऱ्यांनी करियर संपवलं; भज्जीनं घेतलं धोनीचंही नाव

गतवर्षीच्या मृत्यूची नोंद यावर्षी

चंद्रपूर जिल्ह्यातील ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ३० डिसेंबरला झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र नागपूर महानगर पालिकेने नववर्षाच्या पहिल्या दिवशी मृत्यूची नोंद केली. दोन दिवस कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची नोंद का होऊ शकली नाही, अशी चर्चा मेडिकल वर्तुळात पसरली आहे. महापालिकेच्या अशा हलगर्जीपणामुळे कोरोनाच्या आकडेवारीत फरक दिसत असल्याचीही चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com