
Nagpur Elections
sakal
नागपूर : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जिल्ह्यातील १२ नगरपंचायतींसाठी मंगळवारी (ता.७) तर १५ नगरपरिषदांसाठी बुधवारी (ता.८) आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली असून संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.