दिवाळीच्या रात्री नागपुरात रक्तरंजित थरार! फटाके फोडण्यावरून वाद, चार जणांनी तरुणाला संपवलं

Nagpur Diwali Murder : अमन ऊर्फ बॉबी सपाटे (वय २७, रा. हुडकेश्‍वर) असे मृत तरुणाचे नाव असून, अक्षय मडावी (वय २८, रा. पांढराबोडी), सुजल शेडाम, समीर कावळे अशी आरोपींची नावे आहेत.
Nagpur murder

Nagpur murder

esakal

Updated on: 

नागपूरमध्ये वाहनासमोर फटाके फोडण्यावरून झालेल्या वादाचे परिणाम तुंबळ हाणामारीत झाले. यावेळी चार जणांनी मिळून एका तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा निर्घृण खून केला. लक्ष्मीपूजनाच्या रात्री बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवनगर चौकात रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

अमन ऊर्फ बॉबी सपाटे (वय २७, रा. हुडकेश्‍वर) असे मृत तरुणाचे नाव असून, अक्षय मडावी (वय २८, रा. पांढराबोडी), सुजल शेडाम, समीर कावळे अशी आरोपींची नावे आहेत. अक्षय तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खूनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय सुजल आणि समीरही रेकॉर्डवरील आरोपी आहेत.

Loading content, please wait...