नागपूर : लोकांच्या सांगण्यावरून गुंतवणूक नकोच

‘वेल्थ’चा सल्लागार हवा; बारकावे, भविष्यातील धोके जाणून घेणे गरजेचे
Investment Tips in Marathi
Investment Tips in Marathisakal

नागपूर : प्रवास सुरू करण्यापूर्वी कुठे जायचे आहे, हे आपण ठरवितोच. त्यानंतरच कसे, कधी जायचे याचे नियोजन करतो. याचप्रमाणे तुमच्या गुंतवणुकीला सुरुवात करताना नियोजन ‘रोडमॅप'' तयार करावा. त्या रोडमॅपचा विचार करूनच पुढील पावले टाकावीत. कुणीतरी सांगितले म्हणून स्वाक्षऱ्या करू नका, पहिले त्याची संपूर्ण माहिती घ्या. परिचयाचा आहे, आपली दिशाभूल करणार नाही, हे जरी खरे असले तरी आपण कशाचा विमा काढतो. आता परिस्थिती बदललेली आहे, आपली गरज काय, त्याचा परतावा किती, आता दिसणाऱ्या परताव्याची तेव्हाची किंमत किती असेल, याही बाबी लक्षात घेण्यासाठी अभ्यासू सल्लागार असणे गरजेचे आहे. प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टर रुग्णांची विचारपूस केल्याशिवाय औषध देतनाही तसेच आपली ‘वेल्थ'' वाढती ठेवण्यासाठी आर्थिक सल्लागार उपयोगी ठरू शकतो.(Don't reject investment at the behest of people)

Investment Tips in Marathi
जळगाव शहरासह जिल्ह्यात धूलिकणांमुळे दृश्‍यमानता कमी

आपली आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित झाल्यानंतर कशासाठी किती रक्कम पाहिजे, त्यानुसार योजना कालावधी आणि रक्कम ठरवावी. तरच उद्दिष्ट्यपूर्तीसाठी मदत होईल. अधिक कालावधीसाठी इक्विटी योजना निवडावी तर कमी मुदतीसाठी हायब्रीड प्रकाराचा अथवा फिक्स डिपॉझिटसारख्या सुरक्षित फंडात ठेवावे. जोखीम अधिक घेऊन शेअर बाजार अथवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे धोक्याचे ठरेल. कारण गरज असेल तेव्हा ते पैसे सहज काढता यावे. कमी जोखीम असलेल्या योजनेत शक्य असल्यास गुंतवणूक करायला कमी धोका आहे. (Investment Tips in Marathi)

मासिक उत्पन्न : मासिक खर्च बरोबर मासिक गुंतवणूक असे सूत्र न अवलंबता गुंतवणूक-खर्च हे सूत्र वापरले आणि शिस्तीने महिन्याची ठरलेली रक्कम बाजूला ठेवावी. आर्थिक स्वातंत्र्याचे उदिष्ट्य गाठणे हे फार अवघड नसते. पण नियोजनबद्ध गुंतवणूक सातत्याने करणे गरजेचे आहे. स्वतःचा विचार हवा, नक्कल टाळावी.

Investment Tips in Marathi
अहमदनगर जिल्ह्यातील प्रवाशांना १३३ बसद्वारे सेवा

गुंतवणूक सूत्र

ॲसेट ॲलोकेशन करताना प्रत्येक गुंतवणूक प्रकाराची सुरक्षितता, परतावा आणि तरलता या तीन निकषांवर विचार करता येतो. त्यानंतर प्रकार निवडता येतात.

१) सुरक्षा : गुंतवलेली रक्कम त्यात खोट न येता ठरलेल्या वेळी तुम्हाला परत मिळणे,

२) परतावा : गुंतवणुकीतील वाढ आणि

३) तरलता : म्हणजे किती दिवसात रक्‍कम काढता येते.

यातील फक्त एकाच घटकाचा विचार न करता तिन्ही घटकांचा समतोल साधून गुंतवणूक करायची असते. फक्त सुरक्षितता बघितली तर परतावा कमी मिळतो, पण परतावा जास्त हवा असेल तर जोखीम जास्त घ्यावी लागते. एकाच प्रकारातून हे तीनही उद्देश सफल होत नसल्याने वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारांचा समावेश करून पोर्टफोलिओ बनवता येतो. पोर्टफोलिओ करण्याचे महत्त्व ओळखून संपूर्ण पोर्टफोलिओवर किती परतावा मिळेल आणि त्याची जोखीम किती असेल, याचा विचार केला पाहिजे. ‘हाय रिस्क, हाय रिटर्न्स’ हे वाक्‍य ‘हाय रिस्क, झिरो रिटर्न्स’ असे बदलू शकते.

''आयुर्विमा पॉलिसी घेताना तुमच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या गरजेनुसार टर्म प्लॅनच्या स्वरूपातील आयुर्विमा पॉलिसी फक्त जोखीम रक्षणाकरिता घ्यावी. विमा संरक्षण आणि गुंतवणूक एकाच विमा पॉलिसीत घेण्याचा प्रयत्न शक्यतो करू नये, कमी प्रीमियममध्ये जास्त विमा संरक्षण देणारी पॉलिसी घ्यावी आणि इतर गुंतवणुकीसाठी म्‍युच्युअल फंड यांचा वापर करावा.''

- जुल्फेश शहा, सनदी लेखापाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com