Jalgaon Dust | जळगाव शहरासह जिल्ह्यात धूलिकणांमुळे दृश्‍यमानता कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dust

जळगाव शहरासह जिल्ह्यात धूलिकणांमुळे दृश्‍यमानता कमी

जळगाव : महिनाभरापासून कधी जोरात पाऊस, तर कधी थंडीचा कडाका वाढला आहे. महाराष्ट्राबरोबर देशभरात कुठे दाट धुके, कुठे अवकाळी पाऊस, तर कुठे कडाक्याची थंडी पडत आहे. रविवारी (ता. २३) तर पाकिस्तानातून सुटलेले वादळ महाराष्ट्रावर धडकल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यतील वातावरणावर झाला. सकाळपासूनच धुक्याचे वातावरण आहे. मात्र ते धूलिकणयुक्त आहे. यामुळे दृश्‍यमानता कमी झाली आहे. लांब अंतरावर पहिले असता दृश्‍यमानता कमी दिसत होती.

हेही वाचा: वाळूमाफियांची अशीही बनवाबनवी..!|डंपर पकडले एक दंड वेगळ्याच नंबरप्लेटवर

पाकिस्तानहून निघालेले धुळीचे वादळ गुजरात अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोचल्याचे हवामान विभागाने सांगितले. कोकणात पाऊस, तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात थंड वारे वाहत आहेत. यामुळे उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात दृश्‍यमानता कमी झाली आहे.

धुळीचे वादळ असल्यामुळे पाकिस्तानातून आलेले धुलीकण हवेत पसरले आहेत. यामुळे समोरचे दिसणे कमी झाले आहे. शिवाय अधून- मधून ढग देखील ये-जा करत आहेत. यामुळे सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणावर जमिनीवर पडत नाही. दृश्‍यमानता कमी झाली आहे.

हेही वाचा: अहमदनगर : कापड बाजारात कोविड तपासणी

हिमाचल प्रदेशात बर्फाचा वर्षाव सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रात त्याचा प्रभाव जाणवत आहे. सकाळी व रात्री थंडीचे वातावरण २९ जानेवारीपर्यंत राहील. नंतर मात्र दुपारचे वातावरणात गरम होईल, अशी माहिती हवामानतज्ज्ञ नीलेश गोरे यांनी दिली.

Web Title: Jalgaon With The City The District Visibility Is Reduced Due To Dust

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaondistrictDust
go to top