Nagpur : नागपूर हादरलं! गृहमंत्री फडणवीसांच्या जिल्ह्यातच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दुहेरी हत्याकांड

मृतदेह आढळले रस्ता दुभाजकावर,वडधामना परिसरातील घटना
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाला दुहेरी हत्याकांडाने सलामी मिळाली. नागपूर हादरलं! गृहमंत्री फडणवीसांच्या जिल्ह्यातच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दुहेरी हत्याकांड चारचाकी वाहनातून आलेल्या आरोपींनी दोन युवकांची निर्घृण हत्या केली. या घटनेने वडधामना परिसर हादरून गेला. दोघांचेही मृतदेह नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील वडधामना येथील जनता दरबार ढाब्यासमोरील रस्ता दुभाजकावर पडून होते. योगेश ऊर्फ तारा मेश्राम(वय२७), महेश ऊर्फ सलमान गजभिये(वय२६) रा. भिवसनखोरी,दाभा अशी मृतांची नावे आहेत.

जनता दरबार ढाब्यासमोरील रस्ता दुभाजकावर दोन युवकांचे मृतदेह असल्याची वार्ता सोमवारी (ता.१९ ) सकाळी ७.३०च्या सुमारास पसरली. योगेश ऊर्फ तारा मेश्राम व मृतक महेश ऊर्फ सलमान गजभिये हे दोघेही दुचाकीने (एमएच ३१, एफजे ०२१४)गोंडखैरीतून राष्ट्रीय महामार्गाने भिवसनखोरीकडे जाण्याकरिता निघाले होते. याचवेळी जनता दरबार ढाब्यासमोर कारने आरोपींनी त्यांच्या दुचाकीस धडक दिली.

दोन युवकांची निर्घृण हत्या

धडकेनंतर योगेश व महेश हे दोघेही गाडीवरून खाली पडले. कारमधून चार आरोपी उतरले व योगेश ऊर्फ तारा मेश्राम याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. आरोपी चार युवक असल्याने दोन्ही युवकांचे काहीच चालले नाही. योगेशच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने त्याचे डोके फुटले होते. तसेच पायावर मार लागल्याचे चित्र दिसून आले. मृत महेशच्या शरीरावर कुठेही घावाचे चिन्ह नसल्याचे लक्षात येत आहे. योगेश आणि महेश यांचा भिवसनखोरीत अवैध दारू विक्रीचा व्यवसाय होता. येथे ते अवैधरीत्या मोहाची दारू विक्री करायचे. त्याच कारणाने तो गोंडखेरीत मोहाची दारू घ्यायला गेला होता. घटनास्थळी मोहाची दारू पोलिसांना आढळली. योगेशच्या हातात मिरची पावडरचे पॅकेट मिळाले. या हत्याकांडात आरोपी म्हणून अब्बास नावाच्या संशयित आरोपीची चर्चा आहे.

व्हिडिओ व्हायरल

घटनेची माहिती मिळताच डीसीपी, एसीपी यांनी वाडी पोलिस गाठले. वाडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता शासकीय रुग्णालयात पाठविले. घटना घडल्यानंतर सर्वप्रथम अपघात की हत्या, याबाबत तर्कवितर्क काढले जात असताना घटनास्थळाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात एका प्रत्यक्षदर्शिने घटना घडल्याचे पाहिले. व्हिडिओत चार जण कारमधून आले व या युवकांवर धारदार शस्त्राने सपासप वार करून गाडीत बसून पळाल्याचे सांगितले आहे. वाडी पोलिसांनी घटनेची नोंद करून आरोपीचा शोध सुरू केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com