

Nagpur Dr Ambedkar College inquiry
sakal
नागपूर : दीक्षाभूमी परिसरातील डाॅ. आंबेडकर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक, मानसिक त्रास दिल्या प्रकरणी विद्यापीठात देण्यात आलेल्या तक्रारीची चौकशी करणाऱ्या समितीला व्यवस्थापनासह प्राचार्यानी असहकार्य केल्याची माहिती समोर आली. बुधवारी (ता.११) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास समितीने महाविद्यालयाला भेट देत, तक्रारकर्ता, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.