
नागपूर : दोन दिवस ब्रेक घेतल्यानंतर पावसाने मंगळवारी पुन्हा शहरात श्रावणसरी कोसळल्या. सकाळी व दुपारच्या सुमारास अनेक भागांमध्ये वातावरण गार झाले होते. विदर्भात पाऊस व ढगाळ वातावरण आणखी एक-दोन दिवस कायम राहणार असून, त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.