नागपूर - शहरात गेल्या दोन वर्षांपासून फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. आर्थिक गुन्हेशाखेने अकरा महिन्यांत दाखल करून घेतलेल्या ३१ गुन्ह्यांमध्ये ठकबाजांनी १४२ कोटींचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे..गेल्या काही वर्षांमध्ये उपराजधानीमध्ये घरफोड्या, चोऱ्या आणि सायबर चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यासोबतच फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. गेल्यावर्षी २५ गुन्ह्यांमध्ये ७० ते ८० कोटींची फसवणूक झाली होती.मात्र, यंदा आर्थिक गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून ३१ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील १२ गुन्हे तपासासाठी पोलिस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आले. उर्वरित १९ गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हेशाखा करीत आहे. त्यापैकी सर्वाधिक अकरा गुन्हे नोव्हेंबर महिन्यात दाखल करण्यात आले असून त्यात एकूण ६४ कोटी ४५ लाख ४१ हजार ७८० रुपयांची फसवणूक ठकबाजांनी केली..प्रमुख गुन्हेसहकारी पतसंस्थेसाठी डेली कलेक्शनचे काम करणाऱ्या एजंटने दारू व्यावसायिकाचे ८७ लाख ७६ हजार १३५ रुपये लंपास केले असून तो पसार आहे.शेअर गुंतवणुकीत १०० टक्के नफ्याचे आमिष दाखवीत बिल्डरसह सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्यांची २ कोटी १८ लाख ७२ हजार १२३ रुपयांनी फसवणूक.म्हाडाच्या न विकलेल्या सदनिका खरेदीसाठी ४४ ग्राहकांना गृहकर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने खासगी संस्थेच्या संचालकाने ५ कोटींनी गंडा घातला..सिंगापूर आणि म्यानमारच्या कंपनीसोबत काळे उडीद खरेदीसाठी केलेल्या करारानंतरही माल पाठविण्यास टाळाटाळ करीत, १८ कोटी १३ लाखांनी प्रसिद्ध व्यापारी अंकित पगारिया यांची फसवणूक केली.व्यापाऱ्याच्या मृत्यूनंतर लहान भाऊ आणि त्यांच्या मुलांनी कंपनीचे ३४ कोटी २७ लाख रुपयांचे शेअर बनावट कागदपत्रांच्या आधारे लाटून फसवणूक केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.