

nagpur news
esakal
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत २८ ऑक्टोबर रोजी नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या रोजगार मेळाव्यात टपाल विभागाच्या दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमध्ये स्टेजवरच वाद झाला. पोस्टमास्टर जनरल (पीएमजी) शोभा मधाळे आणि प्रभारी पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी यांच्यात एकमेकांना धक्के देणे, शाब्दीक खटके उडाले. हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आणि काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला.